Next
‘वन की बात’
BOI
Friday, May 18 | 12:10 PM
15 0 0
Share this story

पुणे : ‘राज्यशासनातर्फे या वर्षात १३ कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट साकारण्याचे ठरवले आहे, त्यासाठी अनोख्या योजना राबवण्यात येणार आहे, सासरी जाताना मुलीला माहेरची आठवण म्हणून झाड लावण्याचे आवाहन करत असताना माहेरच्या साडी प्रमाणे ‘माहेरची झाडी’ असा अभिनव उपक्रम राबवण्याची घोषणा,’ वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे.

राज्यशासनातर्फे पर्यावरण समतोलासाठी वृक्षलागवडीचा उपक्रम हाती घेतला आहे. गेल्या दोन वर्षातील या उपक्रमाचा आढावा तसेच पुढील वर्षातील नियोजन याबाबत आयोजित पत्रकार परिषदेत मुनगंटीवार बोलत होते.

२०१७ मध्ये चार कोटी, तर २०१८ मध्ये १३ कोटी आणि २०१९ मध्ये ३३ कोटी वृक्ष लागवडीचा कालबद्ध कार्यक्रम शासनाकडून हाती घेण्यात आला आहे.

पंतप्रधान जसे ‘मन की बात’ करतात, त्याप्रमाणे वृक्ष लागवडीच्या बाबतीत लोकांनी ‘वन की बात’ करावी अशी अपेक्षा आहे तसेच वृक्ष लागवडीचा इव्हेंट न होता वन सत्याग्रहाचे स्वरुप त्याला द्यावे अशी अपेक्षा ही मुनगंटीवार यांनी यावेळी व्यक्त केली.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link