Next
राजन खान
BOI
Sunday, November 19 | 04:00 AM
15 0 0
Share this story

‘कुठल्या गावात गेलो आणि भाषण केलं तर मला बोलवत नाहीत परत हा माणूसपणा शिकवतो म्हणून. जातधर्मावर पोट भरतंय हो. भांडवली व्यवस्था म्हणजे जातधर्म. धंदा म्हणजे जातधर्म. देव, जात, धर्म ह्या भांडवली व्यवस्था आहेत. यात पैसा आहे. यातला पैसा काढून घ्या, दुसऱ्या दिवशी कोसळतील धडाडकन हे...’ असं रोखठोक मांडणाऱ्या राजन खान यांचा १९ नोव्हेंबर हा जन्मदिन. त्यानिमित्त आजच्या ‘दिनमणी’मध्ये त्यांच्याविषयी थोडक्यात....
.......... 
१९ नोव्हेंबर १९६२ रोजी जन्मलेले राजन खान हे गेल्या तीन दशकांतले महत्त्वाचे कथाकार आणि कादंबरीकार म्हणून प्रसिद्ध आहेत. 

जात, धर्म, पंथ न पाळणारे राजन खान माणसातल्या माणूसपणावर श्रद्धा ठेवून आहेत. ‘मी माणसातल्या करुणेविषयी लिहितो’ असं ते स्वतःच सांगतात. हिंदू आणि मुस्लिम अशा दोन्ही धर्मांतल्या लोकांच्या जीवनव्यवहाराचं सूक्ष्म निरीक्षण करून ते आपल्या कथांमधून मांडतात. वैचारिक आणि लालित्यपूर्ण लेखनाबद्दल ते प्रसिद्ध आहेत.

सामान्यतः लेखक व्यासपीठावरून सडेतोड किंवा परखड बोलताना दिसत नाहीत; पण राजन खान मात्र व्यासपीठावरून आणि प्रसारमाध्यमांसमोर अत्यंत पोटतिडकीने, समाजातल्या अनिष्ट चालीरीतींवर आणि माध्यमांच्या चुकीच्या आणि वाईट प्रथांवर निर्भीडपणे बोलून समाजजागृती करतात हे त्यांचं वैशिष्ट्य. ‘मी कुठल्या गावात गेलो आणि भाषण केलं तर मला बोलावत नाहीत परत, हा माणूसपणा शिकवतो म्हणून. जातधर्मावर पोट भरतंय हो. भांडवली व्यवस्था म्हणजे जातधर्म. धंदा म्हणजे जातधर्म. देव, जात, धर्म या भांडवली व्यवस्था आहेत. यात पैसा आहे. यातला पैसा काढून घ्या, दुसऱ्या दिवशी कोसळतील धडाडकन हे...’ असं रोखठोक मांडणारे राजन खान.  

रस अनौरस, ग्वाही आणि वेगळी नसलेली गोष्ट, कसक, गाठी गाठी जीव, हिलाल, सत् ना गत, एकूण माणसांचा प्रदेश, जन्मजंजाळ, जमीन, गूढ, बाईच्या प्रेमाच्या दोन गोष्टी – अजब गजब जगणं वागणं, तंतोतंत, यतीम, बाहेरनाती, बाईजात, चिमूटभर रूढीबाज आभा, अशी त्यांची अनेक पुस्तकं प्रसिद्ध आहेत.

सावंतवाडीमध्ये भरलेल्या विद्रोही साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. ते स्वतः ‘अक्षर मानव माणूस संमेलन’ भरवत असतात.

(राजन खान यांची सर्व पुस्तके ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी येथे क्लिक करा. दररोज प्रसिद्ध होणाऱ्या ‘दिनमणी’ सदरातले स्फुट लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/QMr7oP या लिंकवर वाचता येतील.)

(राजन खान यांची ‘बाइट्स ऑफ इंडिया’वरील विशेष मुलाखत वाचण्यासाठी येथे क्लिक करा.) 
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link