Next
श्रीराम जनरल इन्शुरन्सतर्फे अॅपद्वारे विमा योजनांचे वितरण
प्रेस रिलीज
Tuesday, March 27, 2018 | 03:45 PM
15 0 0
Share this story

कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक नीरज प्रकाश
मुंबई :   ‘श्रीराम जनरल इन्शुरन्स कंपनीने एमनोव्हा मोबाइल अॅपद्वारे दरमहा ४० हजारांपेक्षा जास्त विमा योजनांची विक्री केली असून प्रीमियममध्ये १५० टक्क्यांचा विकास साधला आहे’, अशी माहिती कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक नीरज प्रकाश यांनी दिली.

ते म्हणाले, ‘भारत सरकारच्या डिजिटल इंडिया धोरणाशी सुसंगत राहात आम्ही सर्व व्यासपीठांवर आमचे डिजिटल अस्तित्व विस्तारले आहे.  त्याच्या मदतीने आम्ही आज हजारो ग्राहकांपर्यंत पोहोचलो आहोत. सुरुवातीला केवळ काही शाखांतच त्याद्वारे विक्री केली जात होती. मात्र,  आता संपूर्ण देशभरात त्याच्या सहाय्याने विमा योजनांची विक्री केली जात आहे. यामुळे ग्राहकांना जलदगतीने आणि अचूक सेवा देणे शक्य झाले आहे. एमनोव्हा चॅटबोटद्वारे ग्राहकांच्या शंकांचे निरसन सहजपणे केले जाते. चार भाषांमध्ये ही सेवा उपलब्ध आहे. या अॅपद्वारे ग्राहकांना प्रपोजल पाठवता येते. कागदपत्रे जोडता येतात. डिजिटल सही करता येते.’
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link