Next
‘बाळाच्या वाढीसाठी मातेचे दूध सर्वोत्तम’
प्रेस रिलीज
Friday, September 21, 2018 | 05:00 PM
15 0 0
Share this story

मुंबई : ‘स्तनपानामुळे नवजात अर्भकांना सर्वात चांगली पोषणमूल्ये मिळतात. यातून सुयोग्य प्रमाणात जीवनसत्त्वे, प्रथिने आणि मेद बाळाला मिळतात. याशिवाय ते बाळाला चांगल्याप्रकारे पचन होईल अशा स्वरूपात मिळते. मातेच्या दुधात इम्यूनोग्लोबुलिन आणि अँटीबॉडीजचे घटक असतात, यामुळे बाळाला जीवाणू आणि विषाणूंशी लढण्याची शक्ती मिळते. ज्या बाळांना पहिले सहा महिने नियमित स्तनपान मिळते, त्यांच्या कानाचे संसर्ग, श्वसनाचे आजार आणि जुलाब यांचा त्रास होत नाही,’ अशी माहिती हिमालया ड्रग कंपनीच्या आयुर्वेद तज्ज्ञ आणि आरअँडडी डॉ. सुभाषिनी एन.एस. यांनी दिली.

नवमातांना स्तनपानाचे महत्त्व कळावे याहेतूने त्यांनी नवमातांना मार्गदर्शन केले आहे. लहान मुलांच्या वाढीमध्ये मातेच्या दुधाला अनन्यसाधारण महत्त्व आहे, यामुळेच बाळ जन्मल्यानंतर पहिले सहा महिने मातांनी उत्तम प्रकारे बाळांना स्तनपान करण्याची शिफारस डब्ल्यूएचओने केली आहे. बाळाच्या वाढीसाठी मातेचे दूध सर्वोत्तम, सर्वात सुलभ आणि सर्वात सहजी उपलब्ध होणारे पौष्टिक खाद्य आहे. स्तनपानामुळे मधुमेहाचे दोन प्रकार आणि काही प्रकारातील स्तनाच्या आणि अंडाशयासंबंधातील कर्करोगांना आळा बसतो.

डॉ. सुभाषिनी म्हणाल्या, ‘नव्याने स्तनपान सुरू केलेले असताना, स्तनांच्या स्वच्छतेसाठीही नियमित स्तनपान आवश्यक असते. स्तनपानाशी संबंधित कोणतेही संसर्ग टाळण्यासाठी मातेने स्तन आणि स्तनाग्र योग्य प्रकारे स्वच्छ करणे गरजेचे आहे. यामुळेच मातेने साधेपणाने स्तन स्वच्छ करावेत आणि स्तनाग्रांवर कोकम बटर आणि व्हर्जिन कोकोनेट तेल लावावे, यामुळे स्तनाग्रे कोरडी होणे, त्यावर तडे जाणे आणि जखमा होणे या त्रासांपासून आराम पडू शकतो,’

‘स्तनपान केल्यानंतर स्तनाग्रांतून आगंतुक स्त्राव येत नाही ना याची काळजी घेणेही गरजेचे आहे, यासाठी तुम्ही कोकोनट तेलासह असलेल्‍या वाइप्सचा वापर करू शकता. यामुळे तुमची स्तनाग्रे स्वच्छ करण्यासाठी तुम्ही कोणत्याही सिंथेटिक उत्पादने वापरणे टाळून जखमा, तडे आणि उत्तम स्वच्छता यासाठी नैसर्गिक घटक असलेली ही उत्पादने तुम्ही जरूर वापरू शकता,’ असे त्यांनी नमूद केले.

‘जेवढा वेळा शक्य असेल तेवढा वेळा स्तनपान करायला हवे, कारण दूध पटकन जिरते, यामुळे शक्यतो दर दोन तासांनी स्तनपान केले पाहिजे. एखाद्या शांत खोलीत बसून एखाद्या खुर्चीत किंवा कोचवर बाळाला घेऊन बसा आणि भरपूर उशांचा आधार घ्या, हीच बाळाला दूध पाजण्यासाठीची योग्य पद्धत आहे,’ असा सल्ला त्यांनी दिला आहे.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link