Next
‘जेट एअरवेज’च्या ताफ्यात ‘बोईंग ७३७ मॅक्स ८’ विमानाची भर
प्रेस रिलीज
Thursday, July 05, 2018 | 02:45 PM
15 0 0
Share this story


मुंबई :  आघाडीची विमानसेवा कंपनी ‘जेट एअरवेज’च्या ताफ्यात ‘बोईंग ७३७ मॅक्स ८’ या नवीन विमानाची भर पडली आहे. ‘बोईंग ७३७’ विमानांच्या मालिकेतील हे पुढचे विमान आहे. 

याबाबत अधिक माहिती देताना ‘जेट एअरवेज’चे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय दुबे म्हणाले, ‘उत्कृष्ट कामगिरी आणि विश्वासार्हतेच्या दृष्टीने ‘७३७ मॅक्स८’ या विमानांची रचना करण्यात आली आहे. पुढील दशकात वापरल्या जाणाऱ्या  २२५ मॅक्स विमानांपैकीचे ‘जेट एअरवेज’चे हे पहिले विमान आहे. हे नवीन विमान म्हणजे ‘आयल ७३७’ विमानांचे ‘अपग्रेडेशन’ आहे. जगभरातील सर्व व्यावसायिक विमाने याच पद्धतीची आहेत. ‘७३७ मॅक्स ८’च्या समावेशामुळे ‘जेट एअरवेज’ आणि भारतीय हवाई क्षेत्रामध्ये एका नवीन अध्यायाला प्रारंभ होत आहे.

 ‘७३७ मॅक्स ८’ हे विमान आमच्या धोरणाचा एक महत्त्वाचा भाग आहे. या विमानामध्ये अनेक नवीन सोयीसुविधा उपलब्ध करण्यात आल्यामुळे ग्राहकांना उत्तम प्रवास केल्याचा अनुभव मिळेल. हे विमान इंधन बचतपूरक असल्यामुळे आमच्या संस्थेची वाढ होण्यास तसेच खर्चात कपात करण्यासही मदत होईल.’ 
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link