Next
संचेती हॉस्पिटलमध्ये फास्टट्रॅक नी रिप्लेसमेंट सर्जरी सुविधा
BOI
Tuesday, December 18, 2018 | 06:40 PM
15 0 0
Share this article:

संचेती हॉस्पिटलमध्ये फास्टट्रॅक नी रिप्लेसमेंट सर्जरी सुविधा सुरू करण्यात आली. या वेळी कन्सल्टंट नी सर्जन डॉ. सनी गुगळे, संचेती हॉस्पिटलचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. पराग संचेती, डॉ. कैलास पाटील आणि हॉस्पिटलच्या कार्यकारी संचालिका मनिषा संघवी

पुणे : गुडघा बदल शस्त्रक्रियेनंतर अवघ्या तीन दिवसात घरी जाता येईल, अशा फास्ट ट्रॅक नी रिप्लेसमेंट शस्त्रक्रियांची सुविधा संचेती हॉस्पिटलने सुरू केली आहे. संचेती हॉस्पिटलने नुकतीच १२ डिसेंबर २०१८ रोजी यशस्वी ५३ वर्षे पूर्ण केली असून, ५४ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून, येथे तांत्रिकदृष्ट्या प्रगत शस्त्रक्रियांची सेवा उपलब्ध करण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती देताना संचेती हॉस्पिटलचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. पराग संचेती म्हणाले, ‘या शस्त्रक्रियांद्वारे रूग्णांवर तांत्रिकदृष्ट्या प्रगत प्रक्रिया केल्या जातील,ज्यामुळे रूग्णांना कमीतकमी वेदना होतील आणि कमीत कमी वेळेत ते पुन्हा घरी जाऊ शकतील. फास्ट ट्रॅक नी रिप्लेसमेंट सर्जरीज एका वेळेस एका गुडघ्याच्या शस्त्रक्रियेसाठी असून, रूग्णांना ७२ तासांच्या आत डिस्चार्ज मिळण्यासाठी मदत होईल. घरी गेल्यानंतर आमची फिजिओथेरपीस्टची टीम त्यांच्या घरी जाऊन फिजिओथेरपीचे सेशन्स घेतील.यामुळे रूग्ण घरच्या वातावरणात लवकर बरे होऊ शकतील. फास्ट ट्रॅक नी रिप्लेसमेंट सर्जरीमुळे इतर बाबतीत निरोगी रूग्ण ज्यांना फक्त गुडघ्यांचा त्रास असेल, त्यांच्यावर कमीत कमी वेळात विशेष आणि अत्याधुनिक तांत्रिक प्रक्रियेने उपचार करण्यात येईल. अत्याधुनिक पायाभूत सुविधा,कुशल डॉक्टरांची टीम यामुळे हे शक्य झाले आहे.’

ते पुढे म्हणाले, ‘बरेचदा रूग्णांना होणाऱ्या कमी-जास्त वेदनांमुळे ते शस्त्रक्रियेकरिता उशीर करतात. त्यामुळे भविष्यात जास्त गुंतागुंत निर्माण होऊ शकते. म्हणूनच योग्य वेळी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घेऊन निर्णय घेणे महत्त्वाचे ठरते. फास्ट ट्रॅक नी रिप्लेसमेंट सर्जरीमध्ये कमीत कमी छेदासह शस्त्रक्रिया केल्या जातात आणि नंतर फिजिओथेरपी टीमच्या मदतीने रूग्ण त्यांच्या घरी आरामदायी वातावरणात पूर्णपणे बरे होऊन आपल्या कामाला लागू शकतात.’

‘१९६५ मध्ये स्थापन झालेल्या संचेती हॉस्पिटल्सने आतापर्यंत पुण्यामध्ये चार ठिकाणी संचेती क्लिनिक्स, हॉस्पिटल मॅनेजमेंट आणि फिजिओथेरपी शिक्षणाची सुविधा असणारी संचेती अॅ्कॅडमी आणि संचेती इन्स्टिट्युटद्वारे सेवा देण्याचा प्रयत्न केला आहे. आर्थोपेडिक्स क्षेत्रातील सर्व विशेष आणि सुपर स्पेशालिटी सेवा ज्यामध्ये जॉईंट रिप्लेसमेंट आर्थोस्कोपी, स्पाईनल सर्जरी, र्हुममॅटोलॉजी आणि आर्थराईटीस, खांद्यांची शस्त्रक्रिया, प्लॅस्टिक व रिकन्स्ट्रक्टीव्ह शस्त्रक्रिया, न्युरोलॉजी, हॅंड व मायक्रोव्हॅस्क्युलर सर्जरी, फेसिओ मॅक्सिलरी आणि डेंटल सर्जरी, स्पोर्टस् एंज्युरी, अॅटनेस्थेशियोलॉजी यांचा समावेश आहे, हे सर्व एकाच छताखाली उपलब्ध केले आहे.

या वेळी कन्सल्टंट नी सर्जन डॉ. कैलास पाटील, डॉ. सनी गुगळे आणि संचेती हॉस्पिटलच्या कार्यकारी संचालिका मनिषा संघवी उपस्थित होते. 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search