Next
जनसेवा पुरस्कार ‘सक्षम’ संस्थेस जाहीर
प्रेस रिलीज
Monday, October 23 | 06:07 PM
15 0 0
Share this story

जनसेवा पुरस्काराची घोषणा करताना जनसेवा सहकारी बँक लि.चे सरव्यवस्थापक विनायक जोशी, मुख्य कार्यकारी अधिकारी शिरीष महाबळ, अध्यक्ष सीए प्रदीप जगताप, उपाध्यक्ष डॉ. राजेंद्र हिरेमठ, संचालक राजेंद्र वालेकर

पुणे : ‘जनसेवा सहकारी बँक लि.च्या ४५ व्या वर्धापन दिननिमित्ताने ‘जनसेवा’ पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. हा पुरस्कार सोहळा मंगळवारी, २४ ऑक्टोबर रोजी बिबवेवाडी येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नाट्यगृह, येथे सायंकाळी ५.३० वाजता आयोजित करण्यात आला आहे.  या समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून संस्कार भारती - पश्चिम महाराष्ट्र प्रांतचे कार्यवाह आणि भोसला मिलीटरी स्कूलचे कार्याध्यक्ष प्रकाश पाठक उपस्थित असणार आहेत’, अशी माहिती जनसेवा सहकारी बँक लि.चे सरव्यवस्थापक विनायक जोशी यांनी पत्रकार परिषदेत दिली. या वेळी मुख्य कार्यकारी अधिकारी शिरीष महाबळ, अध्यक्ष सीए प्रदीप जगताप, उपाध्यक्ष डॉ. राजेंद्र हिरेमठ, संचालक राजेंद्र वालेकर उपस्थित होते.

ते पुढे म्हणाले, ‘यावर्षीचा जनसेवा पुरस्कार दिव्यांगांच्या सर्वागीण विकासासाठी अविरत कार्य करणार्या  सक्षम (समदृष्टी क्षमता विकास एवं अनुसंधान मंडळ)  या संस्थेस देण्यात येणार आहे. रुपये १लाख १ हजार  आणि सन्मानचिन्ह, मानपत्र, शाल, श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप असणार आहे. २४ ऑक्टोबर १९९८ पासून या पुरस्काराची सुरुवात करण्यात आली. सुरुवातीला या पुरस्काराचे स्वरूप रोख रुपये २५ हजार होते. एकोणचाळीसाव्या वर्धापन दिनापासून रुपये ५१ हजार, सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ असे होते.  त्रेचाळीसाव्या वर्धापन दिनापासून पुरस्काराची रक्कम रुपये १ लाख १ हजार  आणि सन्मानचिन्ह, मानपत्र, शाल, श्रीफळ  असे आहे. पहिला पुरस्कार १९९८ साली दादा किराड, प्रभाकर भट यांना देण्यात आला. आजपर्यंत १८ जनसेवा पुरस्कार प्रदान करण्यात आले आहेत. गेल्या वर्षी रा. स्व. संघाच्या प्रेरणेतून ग्रामविकासाचे प्रभावी कार्य करणाऱ्या नांदेड जिल्ह्यातील समराळा या गावास जनसेवा पुरस्कार देण्यात आला.  
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link