Next
विद्यार्थ्यांना वैयक्तिक स्वच्छतेचे धडे देण्यासाठी कलसाडी जि. प. शाळेत शिक्षिकेचा पुढाकार
BOI
Thursday, August 29, 2019 | 01:05 PM
15 0 0
Share this article:नंदुरबार :
कलसाडी (ता. शहादा, जि. नंदुरबार) येथील जिल्हा परिषद शाळेत इयत्ता तिसरीच्या वर्गात विद्यार्थ्यांना स्वच्छतेचे धडे देण्यासाठी शिक्षिका स्नेहल गुगळे यांनी अनोखा उपक्रम राबविला आहे. त्यांनी सर्व मुला-मुलींना वर्गात कायम वापरता येण्यासाठी एक स्वच्छता किट वर्गात ठेवले आहे. त्यात आरसा, कंगवा, तेल, टिकली, पावडर, नेलकटर या गोष्टी उपलब्ध आहेत. त्याच्या वापराने आपले आरोग्य कसे चांगले राहील, हे गुगळे यांनी विद्यार्थ्यांना पटवून दिले आहे.गुगळे काही दिवसांपूर्वीच बदली होऊन कलसाडी येथील शाळेत रुजू झाल्या. २५ मुले आणि १५ मुली असलेल्या तिसरीच्या वर्गाची जबाबदारी त्यांच्याकडे देण्यात आली. आपला वर्ग, आपले विद्यार्थी स्वच्छ, सुंदर, टापटीप असले पाहिजेत, त्यांना स्वच्छतेचे धडे दिले पाहिजेत आणि त्यासोबत कृतीही व्हावी म्हणून वर्गातील सर्व मुलींना गुगळे यांनी स्वतः हेअर बेल्टचे वाटप केले. केस व्यवस्थित धुवावेत, त्यात हेअर पिन, हेअर बेल्ट लावावा हे त्यांनी मुलींना पटवून दिले आणि वर्गातील मुलींना वर्गातील मुलींच्याच हस्ते हे वाटप करण्यात आले. त्यांच्यातील एकीला अध्यक्ष आणि इतर तिघांना प्रमुख पाहुणे बनवले होते. पहिल्यांदाच आपल्याही हातून काही तरी वाटप झाले, याचा विद्यार्थिनींना आनंद झाला, असे गुगळे यांनी सांगितले. 

वर्गातील सर्व मुला-मुलींना वापरता येण्यासाठी गुगळे यांनी वर्गात एक ‘स्वच्छता किट’सुद्धा आणले आहे. निरोगी शरीरात निरोगी मन वास्तव्यास असते. त्यामुळे विद्यार्थ्यांचे मन प्रसन्न राहण्यासाठी हा छोटासा, पण महत्त्वाचा उपक्रम राबविल्याचे गुगळे यांनी सांगितले.

‘एके दिवशी शिक्षण परिषदेमुळे सकाळची शाळा असल्याने काही विद्यार्थी घाईघाईने शाळेत आल्याने त्यांचे तेल, भांग, टिकली, पावडर राहून गेल्याचे माझ्या लक्षात आले. त्यामुळे विद्यार्थी, विद्यार्थिनींना मी स्वतः टिकली-पावडर करून डोक्याला तेल लावून, केस विंचरून दिले. स्वच्छता किटचाही वापर केला. एकमेकांकडे हसऱ्या चेहऱ्याने पाहणाऱ्या त्या निरागस चिमुकल्यांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून मनस्वी आनंद मिळाला आणि केलेल्या कृतीचे समाधान लाभले,’ असा अनुभव गुगळे यांनी सांगितला.

‘मुलांमध्ये चांगले बदल घडविणे आणि त्यांची गुणवत्ता सिद्ध करणे यातच खरा आनंद व समाधान राहणार आहे,’ असे त्यांनी नमूद केले. 

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Chhaya Ajay Patil About 22 Days ago
Very nice activity mam
0
1

Select Language
Share Link
 
Search