Next
पंचामृत
BOI
Monday, May 28 | 10:30 AM
15 0 0
Share this story

कविता, कथा, लेख आणि अनुभवपर लेखनाचा समावेश असलेले हे पुस्तक. नीलकमल यांनी वेळोवेळी केलेले हे लेखन आहे. मनातले वादळ संगीताच्या साथीने शमते, तेव्हा शब्द ओठी येतात, ‘माझ्या मनाचे आकाश, निरभ्र निळेभोर, तेजाळे प्रकाश, अनाहत चंद्रकोर.’

अवखळ वयात लग्न झाले, मुले झाली; पण मनाच्या एका कोपऱ्यात अशी भावना असतेच ‘हे प्रीतीचे या काटेवनात आले स्वप्नातल्या कळीची पाकळी पाकळी उमले.’ या कविता जशा आहेत, तसेच वेळोवेळी मनात आलेल्या विचारांनाही त्यांनी शब्दरूप दिले आहे. नीलकमल यांचा संगीताचा अभ्यास त्यांच्या लेखांमधून समोर येतो. ‘स्वर आणि शब्द’ या लेखात रियाज, ख्याल गायकी, उपशास्त्रीय गायनाबद्दल लिहिले आहे. ‘थोडसं, सुंदरतेबद्दल’ या लेखात सौंदर्याचा विविध अंगाने विचार केला आहे. नीलकमल यांच्या शिष्यांच्या अभिप्रयांचाही समावेश पुस्तकात आहे.

प्रकाशक : मधुश्री प्रकाशन
पाने : २९०
किंमत : ४१० रुपये
      
(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link