Next
हॅरिएट बिचर स्टॉव्ह
BOI
Thursday, June 14, 2018 | 03:45 AM
15 0 0
Share this story

ज्या लेखिकेच्या ‘अंकल टॉम्स केबिन’ या कादंबरीला अफाट लोकप्रियता मिळून अमेरिकेत ‏गुलामगिरीविरुद्ध चळवळ उभी राहू शकली, ती लेखिका म्हणजे हॅरिएट बिचर स्टॉव्ह. १४ जून हा तिचा जन्मदिन. त्यानिमित्त आजच्या ‘दिनमणी’मध्ये तिचा अल्प परिचय...
......  
१४ जून १८११ रोजी कनेक्टिकटमध्ये जन्मलेली हॅरिएट बिचर स्टॉव्ह ही अमेरिकेतल्या गुलामगिरीविरुद्ध आवाज उठवणारी लेखिका म्हणून प्रसिद्ध आहे. सिनसिनॅटीमध्ये राहायला गेल्यावर तिने शाळेसाठी काम करायला सुरुवात केली आणी त्याच वेळी तिथल्या स्थानिक वृत्तपत्रांतून तिच्या काही कथा आणि स्केचेस वगैरे प्रसिद्ध व्हायला सुरुवात झाली होती. लग्न झाल्यावर तिच्या नवऱ्याने तिला लिहायला उत्तेजन दिलं आणि त्यातूनच तिचं ‘मेफ्लॉवर’ हे पुस्तक प्रसिद्ध झालं. ती राहत असलेल्या ओहायो नदीच्या पलीकडल्या तीरावर काही गुलामांची वसाहत होती. त्यांचं आयुष्य तिने जवळून बघितलं आणि पुढे मेनमध्ये राहायला गेल्यावर तिने गुलामांच्या आयुष्यावर एक कादंबरी लिहायला घेतली. ती १८५२ साली ‘अंकल टॉम्स केबिन’ म्हणून जगप्रसिद्ध झाली. त्या कादंबरीच्या पहिल्या दिवशी तीन हजार, पहिल्या आठवड्यात दहा हजार आणि एका वर्षात तीन लाख प्रती विकल्या गेल्या. त्या कादंबरीचे भराभर इतर भाषांमध्ये अनुवाद झाले, तिचं नाट्यरूपांतरही झालं आणि सिनेमेही निघाले.

‘अंकल टॉम्स केबिन’ या कादंबरीत ‘टॉम’ नावाच्या गुलामाच्या हलाखीच्या जिण्याची कथा तिने मांडली आहे. केंटकीमधल्या शेल्बी कुटुंबावर कर्जापायी शेत गमावण्याची पाळी येते. पैसे उभे करण्यासाठी ते अंकल टॉम या मध्यमवयीन गुलामाला आणि हॅरी नावाच्या (शेल्बी कुटुंबाच्या एलिझा दाईच्या) लहान मुलाला एका गुलामांच्या व्यापाऱ्याला विकायचं ठरवतात. त्या रात्री एलिझा पळून जाते. टॉमला मिसिसिपीमधून जाणाऱ्या एका बोटीवर विकण्यात येतं. अत्यंत श्रद्धाळू आणि बायबल वाचून प्रार्थना करणाऱ्या टॉमचं पुढे काय होतं? कादंबरी कुठल्या वळणाने जाते? पुढे काय काय घडतं ते मुळातून वाचण्यासारखं! या कादंबरीची लोकप्रियता इतकी वाढली, की त्या कादंबरीने अमेरिकन लोकांच्यात गुलामगिरीविरुद्ध उघड बोलण्याला आणि गुलामगिरी संपुष्टात आणण्याच्या चळवळीला प्रेरणा दिली. 

हॅरिएट स्टॉव्हने एकूण ३० पुस्तकं लिहिली. दी मिनिस्टर्स वुइन्ग, दी पर्ल ऑफ ऑर्स आयलंड, लिटल पुस्सी विलो, माय वाइफ अँड आय, बेट्टीज ब्राइट आयडिया, दी पुअर लाइफ, क्विअर लिटल फोल्क्स, अशी तिची इतर पुस्तकं प्रसिद्ध आहेत.

एक जुलै १८९६ रोजी हर्टफर्डमध्ये तिचा मृत्यू झाला.

(प्रा. वा. शि. आपटे यांनी केलेला ‘अंकल टॉम्स केबिन’चा अनुवाद ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागविण्यासाठी येथे क्लिक करा. दररोज प्रसिद्ध होणाऱ्या ‘दिनमणी’ सदरातले स्फुट लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/QMr7oP या लिंकवर वाचता येतील.)
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link