Next
राष्ट्रीय कथक उत्सवाचे पुण्यात आयोजन
ऋजुता सोमण कल्चरल अकादमीचा उपक्रम
BOI
Tuesday, March 05, 2019 | 05:41 PM
15 0 0
Share this story


पुणे : नवी दिल्लीतील कथक केंद्राच्या वतीने आणि इंडियन इन्स्टिट्यूटस ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च, पुणे विभागाच्या (आयसर) आणि ऋजुता सोमण कल्चरल अकादमी यांच्या सहयोगाने नऊ आणि दहा मार्च दरम्यान ‘कथक उत्सव’ या राष्ट्रीय कथक नृत्योत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. 

या बहारदार कथक उत्सवात नवोदित कलाकारांची नृत्य प्रस्तुती प्रेक्षकांना अनुभवता येणार असून, यासोबतच उत्सवात नृत्यगुरु राजेंद्र गंगाणी, मालती श्याम, समीक्षा शर्मा आणि ऋजुता सोमण यांच्यासारखे दिग्गज कलाकारांचा नृत्याविष्कार पाहण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे. 

ऋजुता सोमण
‘हा उत्सव पाषाण येथील इंडियन इन्स्टिट्यूटस ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्चच्या सी. व्ही. रमण सभागृहात सायंकाळी साडेसहा वाजता होणार आहे. हा कार्यक्रम सर्वांसाठी मोफत आहे. या उत्सवाला तालयोगी पंडित सुरेश तळवलकर, पंडित जयतीर्थ मेवुंडी, आदिनाथ मंगेशकर आदी मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे,’ अशी माहिती ऋजुता सोमण कल्चरल अकादमीच्या संचालिका ऋजुता सोमण यांनी दिली.

या कथक उत्सवामध्ये नऊ मार्च रोजी नवी दिल्ली येथील कथक केंद्राचे विद्यार्थी ‘तालायन’ ही गुरु राजेंद्र गंगाणी द्वारे नृत्य दिग्दर्शित रचना सादर करतील.

 त्यानंतर ऋतुजा सोमण आणि मालती श्याम यांचे एकल कथक नृत्याचे सादरीकरण होईल, तर दहा मार्च रोजी कथक केंद्राचे विद्यार्थी ‘नृत्य उल्हास’ आणि ‘नृत्य बसंत’ हा गुरु मालती श्याम यांनी दिग्दर्शित केलेला कार्यक्रम सादर करणार आहेत. नृत्यगुरु राजेंद्र गंगाणी आणि समीक्षा शर्मा यांचे एकल सादरीकरणही प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. 
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link