Next
‘सत्या मायक्रोकॅपिटल’ची ४० कोटींची निधी उभारणी
प्रेस रिलीज
Saturday, September 29, 2018 | 04:08 PM
15 0 0
Share this article:

मुंबई : भारतातील आघाडीची मायक्रो फायनान्स कंपनी सत्या मायक्रोकॅपिटल लिमिटेडने गैर परिवर्तनीय डिबेंचर्स (एनसीडी) जारी करून खाजगी डेट फंड रिस्पॉन्सिबिलिटी आणि मायक्रो फायनान्स इन्हेन्समेंट फॅसिलिटी एसएद्वारे (एमईएफ) ४० कोटी रुपये जोडले आहेत. या निधीचा वापर भारतीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम व्यावसायिकांना कर्ज देण्यासाठी केला जाईल. ज्या महिला आपला स्वतःचा व्यवसाय सुरू करून त्याचा विस्तार करू इच्छितात त्यांची मदत सत्या मायक्रोकॅपिटलतर्फे केली जाते.            

‘सत्या मायक्रोकॅपिटल’चे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक तिवारी म्हणाले, ‘मागील आर्थिक वर्षापासून आम्ही चांगल्या व्यवसाय वृद्धीची नोंद केली असून, देशातील ११ राज्यांच्या उपस्थितीसह विकासाच्या महत्त्वपूर्ण टप्प्यावर येऊन पोहोचलो आहोत. उपलब्ध निधीद्वारे आम्हाला आमचा परिचालन आधार, भांडवली आधार वाढवणे आणि पूर्ण देशात सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांसाठी नवीनतम कर्ज शिफारसींद्वारे जास्त व्यावसायिकांपर्यंत पोहोचण्यास मदत मिळेल.’

‘सत्या मायक्रोकॅपिटल’ एक एनबीएफसी-एमएफआय कंपनी आहे जी लहान व्यावसायिकांना मजबूत क्रेडिट आकलन आणि केंद्रीकृत मंजुरी प्रणालीच्या आधारावर कोलेटरल-मुक्त कर्ज पुरवठा करते. कंपनीने कर्ज वितरण वाढविणे आणि कर्ज वसुलीच्या खात्रीसाठी एक अभिनव लिमिटेड लायबिलिटी ग्रुप (एलएलजी) मॉडेलचा स्वीकार केला आहे.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search