Next
‘फ्रेयर एनर्जी’तर्फे ‘सनप्रो २.०’चे सादरीकरण
प्रेस रिलीज
Wednesday, December 12, 2018 | 04:39 PM
15 0 0
Share this story

पुणे : फ्रेयर एनर्जी या सौरऊर्जा सेवा पुरवठादार कंपनीतर्फे ‘फ्रेयर सनप्रो २.०’ या मोबाइल अॅप्लिकेशनचे सादरीकरण करण्यात आले. सनप्रो ही भारताच्या सर्वात पहिल्या सौर व्यापार मोबाइल अॅप्लिकेशनची नवीन आवृत्ती असून, यामुळे उद्योजकांना सौरऊर्जा व्यापार सहज, सुलभ हाताळायला मदत होणार आहे.  

‘सनप्रो २.०’द्वारे कोणालाही सौरऊर्जा व्यापार सुरू करता येईल. तांत्रिक साह्य, भांडवल आवश्यकता यांसारखे अडथळे दूर करण्यात आले आहे. या मंचाच्या सोप्या युजर इंटरफेसला गुंतागुंतीच्या अल्गोरिदमचे पाठबळ असून, त्याचे स्थानिक सौर उत्सर्जन, सौर धोरण, इतर उपलब्ध ऊर्जा स्त्रोत, जागेची उपलब्धतता, वित्तीय साह्य यांसारखे निर्देशांक कोणत्याही ग्राहकाला सर्वोत्तम शक्य पर्याय शोधायला मदत होणार आहे.    

यापूर्वी, सविस्तर तंत्रशुद्ध-व्यापारी कारणासाठी ऊर्जा आवश्यकता प्रक्रिया पूर्ण करण्यातच काही आठवड्यांचा कालावधी लागत होता; मात्र ‘सनप्रो’च्या साथीने ही संपूर्ण प्रक्रिया आता काही मिनिटांतच पूर्ण होणार आहे. त्याशिवाय, इन-बिल्ट सीआरएम व डेटा अॅनलिटीक्समुळे व्यापारी कामगिरी सुधारणार आहे. ‘सनप्रो २.०’ गुगल प्ले स्टोअर व अॅपल अॅप स्टोअरवर उपलब्ध आहे.  

सौरभ मारडाया प्रसंगी फ्रेयर एनर्जीचे सह-संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक सौरभ मारडा म्हणाले, ‘फ्रेयर एनर्जीमध्ये आमचे उद्दिष्ट्य हे सौरऊर्जा व्यापार सुलभ करण्याचे आहे आणि प्रत्येकासाठी सौरशक्ती उपलब्ध करून देण्याचे आहे. आमचे तंत्रज्ञान हे व्यक्ती, तसेच सूक्ष्म, छोटे, मध्यम स्वरूपातील कंपन्यांना कमीतकमी गुंतवणुकीत सौरऊर्जा व्यवसाय सुरू करून चालविण्यात साह्य करते. सरकारला २०२२ पर्यंत ४० जीडब्ल्यू रुफटॉप सोलार बसविण्याचे महत्त्वाकांक्षी लक्ष्य आहे, ज्यामध्ये तळागाळातील सहभाग आवश्यक आहे. ही दरी ‘सनप्रो’ भरून काढेल अशी आम्हाला आशा आहे.’

‘सनप्रो’चा सर्वसमावेशक मंच हा डिझाइन इंजिनीअर, प्राइजिंग स्पेशलिस्ट, कस्टमर मॅनेजमेंट, सप्लाय चेन व प्रोजेक्ट मॅनेजमेंटचे काम पाहणाऱ्या पाच व्यक्तींच्या टीमसमान असून, याद्वारे अचूक यंत्रणा डिझाइन आणि एकूण खर्चाचा आकडा समजायला मदत होणार आहे. त्यामुळे विक्री प्रक्रिया लवकर पूर्ण होणार आहे.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link