Next
जयगड येथे गुणवंतांचा सत्कार
BOI
Monday, July 30 | 11:23 AM
15 0 0
Share this story

रत्नागिरी : तालुक्यातील सैतवडे, खंडाळा, जयगड परिसरातील दहावी उत्तीर्ण झालेल्या गुणवंतांचा तसेच छोट्या रोजेदारांचा सत्कार नुकताच आमदार उदय सामंत यांच्या आणि ज्येष्ठ उद्योजक रवींद्र उर्फ अण्णा सामंत यांच्या उपस्थितीत करण्यात आला.

शिवसेना वाटद जिल्हा परिषद गट उपविभागप्रमुख अजीम चिकटे यांच्यामार्फत आयोजित हा सत्कार समारंभ जयगड येथील माध्यमिक विद्यामंदिरात झाला. या वेळी अण्णा सामंत आणि आमदार सामंत यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना आणि छोट्या रोजेदारांना गुलाबपुष्प आणि भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले.

या प्रसंगी उपजिल्हाप्रमुख बाबू म्हाप, उपतालुकाप्रमुख प्रकाश साळवी, जिल्हा परिषद सदस्य ऋतुजा जाधव, युवसेना उपतालुका युवाधिकारी आशिष भालेकर, विभागप्रमुख योगेंद्र कल्याणकर, पंचायत समिती सदस्य संजना माने, विभाग संघटक उदय माने, महिला विभागप्रमुख निमा विचारे, उपविभागप्रमुख आरती आडाव, शाखाप्रमुख ऋषी धुंदूर, निसार जांभारकर, विनोद मेणे, सरपंच प्रशांत उर्फ बापू घोसाळे, संजोत चव्हाण, निशा पवार, उपसरपंच मुश्ताक टेमकर करामत मुल्ला, अनिकेत सुर्वे, फरजाना डांगे, चेअरमन सोलकर, सलीम मिरकर आदी मान्यवर उपस्थित होते.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link