Next
‘गडचिरोलीतील शेतकऱ्यांनी ‘किसान सन्मान’मध्ये सहभागी व्हावे’
प्रेस रिलीज
Friday, February 22, 2019 | 12:03 PM
15 0 0
Share this story

गडचिरोली : ‘केंद्र शासनातर्फे जाहीर करण्यात आलेल्या किसान सन्मान निधी योजनेत गडचिरोलीतील शेतकऱ्यांनी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून सहभागी व्हावे,’ असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.

केंद्र शासनाने प्रधानमंत्री केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना राबविण्याचा निर्णय घेतला असून, या योजनेअंतर्गत अल्प व अत्यल्प भुधारक प्रती शेतकरी कुटुंबाला प्रतीवर्ष सहा हजार रुपये इतके आर्थिक साह्य तीन टप्प्यांमध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहे.  या योजनेत प्रती शेतकरी कुटुंबातील सर्व मिळून दोन हेक्टरपर्यंत जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे. वनहक्क कायद्याअंतर्गत जिल्हा समितीने पात्र केलेल्या शेतकरी कुटुंबाचाही या योजनेत समावेश केला आहे.

यात दोन हेक्टरपर्यंत जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांच्या याद्या ग्रामस्तरावर प्रसिद्ध करण्यात आल्या असून, या यादीमध्ये ज्या शेतकरी कुटुंबाचे नाव आहे त्या शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी त्यांचा बँक खाते क्रमांक व आयएफएससी कोड, आधार क्रमांक, वाहन चालविण्याचा परवाना, मनरेगा जॉबकार्ड, केंद्र शासन व राज्य शासनाने निर्गमित केलेल्या अन्य ओळखपत्रांपैकी कोणतेही एक ओळखपत्र आपल्या गावातील संबंधित तलाठी, कृषी सहाय्यक, ग्रामसेवक किंवा आपल्या तालुक्याचे तहसीलदार यांच्याकडे लवकरात लवकर सादर करावेत, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link