Next
‘इंडस इंटरनॅशनल’च्या विद्यार्थ्यांनी माउंट फुजी केले सर
प्रेस रिलीज
Friday, November 23, 2018 | 04:32 PM
15 0 0
Share this storyपुणे : इंडस इंटरनॅशनल स्कूलच्या नऊ विद्यार्थ्यांनी जपान येथील तीन हजार ७७६ मीटर उंचीचे माउंट फुजी हे शिखर यशस्वीरीत्या सर केले. माउंट फुजी हे जगातील सातव्या क्रमांकाचे सर्वात उंच शिखर, तसेच जिवंत ज्वालामुखी आहे. आठ सप्टेंबरला चढायला सुरुवात केली आणि नऊ सप्टेंबरला हे शिखर विद्यार्थ्यांनी सर केले.

ही चढाई इंडस स्कूल ऑफ लीडरशिपचे लीडरशिप ट्रेनर मोहित तोमर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. हैद्राबाद, बंगळूरू आणि पुणे येथील इंडस इंटरनॅशनल स्कूलच्या आठ, नऊ आणि दहा श्रेणी असलेल्या विद्यार्थ्यांनी तोमर यांच्या नेतृत्वाखाली प्रशिक्षण कार्यक्रमाचा भाग म्हणून ही पर्वतारोहण मोहीम सुरू केली. ‘पिक टू लीड’ या कार्यक्रमाअंतर्गत मुलांमध्ये आयुष्यात येणाऱ्या समस्यांना समर्थपणे व धैर्याने तोंड देता यावे यासाठी मार्गदर्शन करण्यात आले.नऊ विद्यार्थ्यांपैकी पाच विद्यार्थी माउंट फुजी शिखरापर्यंत पोहोचले. यामध्ये नऊ श्रेणीतील पुणे ‘इंडस इंटरनॅशनल’चा ईशान सुभेदार, दहा श्रेणीतील हैदराबाद ‘इंडस इंटरनॅशनल’चा विघ्नेश कन्नन, आठ श्रेणीतील हैदराबादचा अरविंद कन्नन, नऊ श्रेणीतील हैदराबादचा उमंग सिंघानिया आणि आठ श्रेणीतील बंगळूरूचा सीझर अफोंसा हुरेत यांनी शिखराला गवसणी घातली.

शिखर यशस्वीरीत्या सर केल्यानंतर ईशान सुभेदार म्हणाला, ‘मी माउंट फुजीच्या शिखरावर पोहचण्याचा निर्धार केला होता. हे शिखर सर करताना आपण हे करू शकू का, याबाबत कधी शंका निर्माण झाली, तर आमचे प्रशिक्षक मार्गदर्शक आमचा आत्मविश्वास वाढवत असे. यशस्वी चढाई करणे हे केवळ प्रयत्न आणि शिस्तीवर अवलंबून असते, असे मला वाटते. माझे शिखर सर करण्याचे स्वप्न सत्यात उतरले असून, माणसाच्या आयुष्याचे मूल्य कळण्यासाठी हा सर्वांत उत्तम मार्ग आहे. माझ्या प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनामुळे मी हे शिखर यशस्वीपणे पूर्ण करू शकलो, यामुळे मी त्यांचा आभारी आहे.’इंडस स्कूल ऑफ लीडरशिपचे संचालक कर्नल सत्या राव म्हणाले, ‘पर्वतारोही हा एक आध्यात्मिक खेळ आहे जो सर्वोत्तम नेतृत्वाचे धडे शिकवतो आणि आंतरिक जगावर विजय मिळवितो. चढाईदरम्यान विद्यार्थ्यांना विपरीत परिस्थितींना तोंड द्यावे लागले. हवामान उग्र होते, अंदाज लावता येण्यासारखे नव्हते, अत्यंत थंड वातावरण होते; परंतु या सर्व विपरीत परिस्थितींवर मात करत त्यांनी त्यांच्या ध्येयावर लक्ष केंद्रित केले व अखेरीस शिखरावर पोहोचले. लीडशिप ही एक अशी गोष्ट आहे, ज्यामध्ये आधी तुम्हाला स्वतःला लीड करायचे असते आणि नंतर इतरांना मार्गदर्शन करायचे असते. या मोहीमेतून आम्हांला खूप काही शिकायला मिळाले.’

‘माउंट फुजीच्या यशस्वी मोहिमेनंतर इंडस स्कूल ऑफ लीडरशिप विद्यार्थ्यांना माउंट एव्हरेस्ट सर करण्यासाठी मार्गदर्शन करणार आहे. माउंट एव्हरेस्ट सर करणे हा ‘पिक टू लिड’ कार्यक्रमाचा भाग आहे. त्यासाठी प्रशिक्षण, शिस्त, परिश्रम आणि दृढनिश्चय यांची प्रचंड आवश्यकता असते. यासाठी आम्हाला आमच्या विद्यार्थ्यांवर पूर्ण विश्वास असून, ते हे नवे आव्हानही यशस्वीपणे पूर्ण करतील,’ असा विश्वास इंडस स्कूल ऑफ लीडरशिपचे लीडरशिप ट्रेनर तोमर यांनी व्यक्त केला.

दोन वेळा माउंट एव्हरेस्ट शिखर सर करणारे कर्नल नीरज राणा यांनी संपूर्ण मोहीम आयोजित केली असून, त्यांना हर्षाली वर्तक यांचे सहकार्य लाभले आहे.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link