Next
‘ब्रिटजो’तर्फे भारतीय बनावटीचा ‘इव्वो’ सादर
प्रेस रिलीज
Saturday, April 21 | 11:56 AM
15 0 0
Share this story

मुंबई : ग्रामीण भागातील डिजिटलायझेशनला चालना देण्याच्या उद्देशाने ‘ब्रिटजो’चे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि सहसंस्थापक प्रदिप्तो गांगुली यांनी भारतीय बनावटीचा मोबाइल फोन ब्रॅंड ‘इव्वो’ सादर केला आहे. या वेळी बॉलिवूड अभिनेत्री यामी गौतम उपस्थित होती.

ब्रँडच्या सादरीकरणासह ‘इव्वो’ने बिट्झ, प्रायमो, सेल्फी, टफ आणि वोल्ट या उत्पादनांच्या पाच विविध श्रेणींमध्ये आठ टू-जी स्मार्ट फीचर फोन सादर केले आहेत. सादर केलेली सर्व उत्पादने ६४९ ते पाच हजार ९९९ या किंमतीमध्ये उपलब्ध आहेत. कंपनी त्यांच्या ‘स्टॉर्म’ मालिकेतील दोन अँड्रॉइड गो फोर-जी स्मार्टफोनसोबतच त्यांचा पहिला फोर-जी फीचर फोन ‘स्कीपर’ सुद्धा सादर करीत आहे. ग्रामीण भागातील ग्राहकांना आकर्षित करून घेण्यासाठी या फोन्समध्ये बहुभाषिक सुविधा, फीचर फोनवर आधारित व्हॉट्सअप, वाय-फाय टिथरिंग, चेहेऱ्यावरून ओळख पटवणे आणि नुकसान प्रतिबंधक काच असलेले स्क्रीन अशा आधुनिक वैशिष्ट्यांचा समावेश आहे.

‘ब्रिटजो’चे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि सहसंस्थापक गांगुली यांनी सांगितले की, ‘ब्रिटजोने ग्रामीण भागातील ग्राहकांना येत असलेल्या महत्त्वाच्या अडचणी ओळखून, पारंपरिक मोबाइल फोनना सुयोग्य पर्याय तयार करण्यासाठी खूप काम केले आहे. आम्हाला ‘इव्वो’ सादर करताना अतिशय आनंद होत आहे, जे आमच्या नावीन्यपूर्ण संशोधन दृष्टीकोनाचे प्रतीक आहे आणि आम्हाला विश्वास आहे, की आमचा ब्रॅंड ग्रामीण भागातील डिजिटलायझेशनमध्ये महत्त्वपूर्ण योगदान देईल.’

‘बिट्झ’ या श्रेणीमध्ये तीन स्मार्ट फीचर फोन सादर करण्यात आले असून, ‘प्रिमो’ श्रेणीमध्ये दोन आणि टफ, वोल्ट आणि सेल्फी श्रेणीमध्ये प्रत्येकी एक फीचर फोन सादर करण्यात आला आहे. संपूर्ण उत्पादन श्रेणीत स्मार्ट अॅप्लिकेशन्स, के-टाइप बॉक्स स्पीकर्स, शॉकप्रूफ डिझाइन्स, वायरलेस एफएम, जास्त वेळ चालणारी बॅटरी, स्वयंचलित कॉल रेकॉर्डिंग आणि वन टच म्युझिक अॅक्सेस यांसारख्या वैविध्यपूर्ण फीचर्सचा समावेश आहे.

लवकरच ‘इव्वो’ची व्हॉट्सअप आणि वायफायची सुविधा उपलब्ध असणारा पहिला फोर-जी फीचर फोन ‘स्कीपर’ सादर करण्याची योजना आहे. ग्राहकांची सुविधा आणि डिजिटल क्षमतेचा वापर करून घेण्यासाठी कंपनीने इंग्रजी, हिंदी, उर्दू यासारख्या विविध प्रादेशिक भाषांमध्ये बहुभाषिक सेवा उपलब्ध करून दिली असून, इतर २२ भारतीय भाषा यामध्ये रिडेबल फॉरमॅटमध्ये वापरल्या जाऊ शकतात.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link