Next
‘दिल है हिंदुस्तानी २’च्या स्पर्धकांचे सोनू निगम मार्गदर्शक
प्रेस रिलीज
Wednesday, June 20 | 03:31 PM
15 0 0
Share this story

मुंबई : उत्कृष्ट प्रतिभा आणि पाय थिरकवायला लावणारा ‘स्टार प्लस’वरील ‘दिल है हिंदुस्तानी’ कार्यक्रम सज्ज झाला आहे. या कार्यक्रमात वैविध्यपूर्ण पार्श्वभूमी असलेले स्पर्धक सहभागी होणार असून, परीक्षक मंडळात बादशाह, सुनिधी चौहान आणि प्रीतम असतील. या कार्यक्रमातील स्पर्धकांना प्रथितयश गायक सोनू निगम मार्गदर्शन करणार आहेत.

‘दिल है हिंदुस्थानी २’च्या माध्यमातून संगीतविश्वाला जादुई आवाज मिळवून देण्यासाठी कोणताही प्रयत्न बाकी न ठेवता निर्मात्यांनी गायक सोनू निगम यांना सर्वश्रेष्ठ १३ स्पर्धकांना प्रशिक्षण देण्यासाठी आमंत्रित केले आहे. सोनू आठवड्यातून एकदा त्यांच्या स्टुडिओमध्ये हे प्रशिक्षण सत्र घेतील आणि त्यांना मार्गदर्शन करतील.  

सूत्रांनी असे म्हटले आहे की, ‘अतिशय चांगली गोष्ट आहे की सोनू निगम त्यांचा अमूल्य वेळ देऊन नवोदित स्पर्धकांना मार्गदर्शन करणार आहेत जे त्यांच्यासाठी त्यांचे स्वप्न सत्यात उतरल्याप्रमाणे आहे. आमचा विश्वास आहे की आमचे स्पर्धक योग्य हाती आहेत. परीक्षक आणि मार्गदर्शक मंडळातील सदस्य संगीतक्षेत्रात अविस्मरणीय कामगिरी केलेले आहेत. प्रशिक्षण आठवड्यात एकदा असेल जे स्पर्धकांचा आत्मविश्वास वाढवण्यात निश्चितच मदत करेल.’
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link