Next
आयुष्याच्या रंगछटा
BOI
Sunday, May 27 | 06:30 AM
15 0 0
Share this story

‘आयुष्याच्या रंगछटा’ या कवितासंग्रहामध्ये माणसाच्या आयुष्यात येणारे चढ-उतार, त्याला वेळोवेळी येणारे अनुभव, नाती-गोती यांचे रेखाटन करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे आणि कवयित्रीने प्रगतीचा संदेश दिला आहे. या कवितासंग्रहाविषयी...
...........
मानवी जीवन फारच गमतीशीर आहे. लहान वयात प्रत्येकास मोठ्यांचे ऐकावे लागते. आपल्या मनासारखे काहीही करता येत नाही. तरीही बालमन पटकन कशातही रमते. तारुण्य म्हणजे उत्साह, उमेद, काहीशी बेधुंदी. त्यामध्ये आपण कधीकधी चुकीचे वागतो. आयुष्याच्या उतरणीचे अनुभव त्याहूनही वेगळे. कधी कधी एकटेपणा, असहायता. परंतु तरीही नातवंडांच्या ओढीमुळे जगण्यात चैतन्य आणणारे क्षण. आई-वडिलांची मनं जपणारी मुलं, चांगल्या सुना या गोष्टी फारच कमी लोकांच्या वाट्याला येतात. परंतु तरीही घराच्या प्रतिमेस जपण्यासाठी प्रत्येक जण झटत राहतो. असे हे आयुष्य म्हणजे सप्तरंगाची उधळण. अशा या आयुष्यात आपण काय केले पाहिजे, हे दर्शविण्याचा आपला मुख्य उद्देश असल्याचे कवयित्री मानसी कानिटकर म्हणतात. ‘प्रत्येक कवितेस स्वतंत्र प्रस्तावना’ हे या कवितासंग्रहाचे खास वैशिष्ट्य आहे.

प्रत्येकाचे बालपण हे सुदृढ व सशक्त असावे, प्रत्येकाची शारीरीक व त्याचबरोबर मानसिक वाढ उत्तम रीतीने झाली पाहिजे. त्यासाठी आरोग्य, शिक्षण, निसर्गाविषयीचे प्रेम, वडिलधाऱ्यांविषयीचा आदर, सामाजिक बांधिलकी, प्रगतीचा व नैतिकतेचा ध्यास या गोष्टींची आवश्यकता असते. त्याकरिता आई-वडिलांनी आपल्या मुलांवर चांगले संस्कार करणे आवश्यक आहे. त्याकरिता चांगले विचार, आचरण आणि नीतिमत्ता ही यशाची त्रिसूत्री दाखविण्याचा प्रयत्न या कवितासंग्रहातून केल्याचे कवयित्री म्हणतात.

मानसी कानिटकर-मराठेया काव्यसंग्रहामधील चवळीचा वेल, निसर्गाची हिरवाई, फळांची टोपली यांसारख्या कवितांमधून निसर्ग, शेती, अन्नधान्य या विषयी माहिती मिळते. जीवनबाग, भरारी यांसारख्या कविता प्रगतीचे संदेश आणि सामाजिकतेची जाणीव करून देतात. विकास, देश माझा हिंदुस्थान या कविता उद्बोधक आशयाच्या आहेत. परीताई, मनीमाऊ, माझी खेळणी यांसारख्या मुलांसाठी लिहिलेल्या कवितांमधून लहान मुलांचे छान मनोरंजन तर होतेच, परंतु त्यातून त्यांच्या कल्पनाशक्तीचाही विकास होतो. भक्तिरसाच्या कवितांमधून देव-देवतांविषयी माहिती मिळते व त्यांचे महत्त्वही समजते. ‘आई’ या कवितेतून संस्कार, माया यांची शिकवण देण्याचा कवयित्रीचा प्रयत्न आहे. एकंदरीतच कवितासंग्रह वाचकांना विचारांची शिदोरी देतो. 
कवितासंग्रह : आयुष्याच्या रंगछटा
कवयित्री : मानसी कानिटकर-मराठे
मोबाइल : ९८३३१ २६०७३
ई-मेल : manaseekanitkar@gmail.com
प्रकाशन : मोहिनीराज प्रकाशन
पाने : ६४
मूल्य : ८० रुपये

(‘आयुष्याच्या रंगछटा’ हा कवितासंग्रह ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागविण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link