Next
पुणे विद्यार्थी गृहामध्ये आंतरराष्ट्रीय योगदिन साजरा
BOI
Friday, June 21, 2019 | 05:52 PM
15 0 0
Share this article:


पुणे : आंतरराष्ट्रीय योग दिवसाचे औचित्य साधून पुणे विद्यार्थी गृहाच्या विविध शाखांमधील विद्यार्थी, तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासाठी योगवर्गाचे आयोजन करण्यात आले होते. सुखकर्ता सांस्कृतिक प्रतिष्ठान, ब्रह्ममूर्त ज्ञानपीठ केंद्र व ज्येष्ठ नागरिक हास्य क्लबच्या संयुक्त विद्यमाने हा योगवर्ग घेण्यात आला.

पुणे विद्यार्थी गृहाच्या सदाशिव पेठेतील परिसरात हा योगवर्ग भरला. या कार्यक्रमाला सुखकर्ता सांस्कृतिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. राजकुमार शहा आणि पुणे विद्यार्थी गृह संस्थेचे कुलसचिव सुनील रेडेकर यांनी उपस्थितांचे स्वागत केले. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून एमआयटी विश्वशांती केंद्राच्या उर्मिला विश्वनाथ कराड उपस्थित होत्या. ब्रह्ममूर्त ज्ञानपीठ केंद्रातर्फे प्रतिभा मोरे, योगगुरु दीपक शिळीमकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी तयार केलेल्या पॉवर सूर्यनमस्काराची प्रात्याक्षिके घेतली. हास्य क्लबच्या सदस्यांनी सहा ते सात हास्य प्रकार उपस्थितांना शिकविले. 

महेंद्र घागरे यांनी चंदनाच्या झाडाच्या बियांचे वाटप केले. संस्थेचे ज्येष्ठ संचालक हणमंत भोसले, संचालक प्रा. राजेंद्र कडुसकर, हास्य क्लबचे मिलींद तांबोळी, चंद्रशेखर कोरडे आणि अशोक कदम हे उपस्थित होते. 

स्वाती दिवाण यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचलन केले आणि सुप्रिया जोशी यांनी आभार व्यक्त केले.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search