Next
इंग्रजी शाळेतील बालवारकऱ्यांच्या दिंडीने जिंकली मने
BOI
Thursday, July 19, 2018 | 05:11 PM
15 1 0
Share this storyसोलापूर :
वाखरी (ता. पंढरपूर) येथील रायझिंग स्टार प्री-प्रायमरी स्कूलच्या विद्यार्थ्यांनी आषाढी वारीनिमित्त काढलेली वारकरी दिंडी सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. ही इंग्रजी शाळा असली, तरी या शाळेने आषाढी वारीच्या निमित्ताने शाळेतील मुलांची दिंडी काढली. इंग्रजी शाळांनाही विठूरायाच्या वारीचे आकर्षण वाटू लागल्याचे चित्र सुखद असल्याची भावना समाजातून व्यक्त होत आहे.

सध्या सगळीकडे आषाढी वारीचा माहौल आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना या वारीचे महत्त्व कळावे, वारकरी परंपरा व वेशभूषेचे ज्ञान त्यांना व्हावे म्हणून गुरुवारी, १९ जुलै रोजी पालखी मार्गावरील वाखरी (ता. पंढरपूर) येथील रायझिंग स्टार प्री-प्रायमरी स्कूलने विद्यार्थ्यांच्या दिंडीचे आयोजन केले. बालवारकऱ्यांची ही दिंडी परिसरात सर्वांचे आकर्षण ठरली होती. पालकांनी आपल्या पाल्यांना घरातूनच वारकऱ्यांच्या वेशात सजवून आणले होते. विठ्ठल-रुक्मिणीच्या वेशभूषेतील विद्यार्थी या दिंडीचे आकर्षण  होते. गावातून ही दिंडी काढल्यावर ग्रामस्थ व पालकांनी या विद्यार्थ्यांचे कौतुक केले. 

या दिंडीसाठी दत्तात्रय महाराज डिंगरे यांनी साह्य केले. या वेळी शाळेचे संस्थापक अध्यक्ष दशरथ कोळवले, सचिव प्रवीण आजळकर, संचालक स्वाती शेंडे, अनिता कोळवले, मुख्याध्यापिका सरस्वती नागणे, जयश्री कुंभार, नागेश पवार, बाळासाहेब शेंडे आदी मान्यवर उपस्थित होते.

(इंग्रजी शाळेतील बालवारकऱ्यांच्या दिंडीचा व्हिडिओ सोबत देत आहोत.)

 
15 1 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Piya About 217 Days ago
Nice. All the best for your bright future little star's.
0
0
कोळवले मारुती दशरथ About 217 Days ago
फारच बोलके व सुंदर. मी आपल्या पेपरचा नियमित वाचक आहे.
0
0
कोळवले मारुती दशरथ About 217 Days ago
अप्रतिम
0
0
Kolawale Maruti Dashrath PANDHARPUR About 217 Days ago
Very nice, read as संस्थेचे अध्यक्ष श्री. कोळवले मारुती दशरथ, पंढरपूर. आपल्या सहकार्या बद्दल शतशः आभारी. द्वारकाई बहुउद्धेशिय संस्था, ईसबावी, पंढरपूर.
0
0
दत्तात्रय भोसले, रोपळे बुद्रूक About 217 Days ago
छान बातमी आहे . वारकरी परंपरा ही सर्वांना समजलीच पाहिजे . इंग्रजी शाळेत मुलांनी वारकरी दिंडी काढल्यामुळे बालवयातच त्यांना वारी विषयी आवड निर्माण होण्यास फायदा होईल . बाळासाहेब शेंडे व कोळवले साहेब तुम्ही छान उपक्रम राबवत आहात . आनंद वाटला .
0
0

Select Language
Share Link