Next
पुण्यात रंगणार आता ‘अबकी बार ठासून मार’
तरुण कलाकारांसाठी रोहित पवारांकडून आगळावेगळा कार्यक्रम
प्रेस रिलीज
Thursday, January 17, 2019 | 05:00 PM
15 0 0
Share this story

पत्रकार परिषदेत माहिती देताना सृजन फाउंडेशनचे अध्यक्ष रोहित पवार व ऋषिकेश दाभाडे

पुणे : प्रत्येकामध्ये एक विनोदी कलाकार दडलेला असतो; मात्र त्याच्या या सुप्त गुणांना योग्य व्यासपीठ व योग्य वेळ कधीकधी मिळत नाही. तरुणाईतील या सुप्त गुणांसाठी सृजन अभियान राबविणारे जिल्हा परिषद सदस्य रोहित पवार ‘अबकी बार, ठासून मार’ हा वेगळा एक कार्यक्रम घेऊन आले आहेत. विनोदाच्या माध्यमातून आजच्या परिस्थितीवर मार्मिक व चपखल भाष्य करणाऱ्या कॉमेडी कलाकारांची मांदियाळी या निमित्ताने पुण्यात पाहायला मिळणार आहे.

या संदर्भात आयोजित पत्रकार परिषदेत माहिती देताना पवार म्हणाले, ‘या स्टॅंडअप कॉमेडीच्या या आगळ्यावेगळ्या माध्यमातून तरुणाईला व्यक्त होता येणार असून, रोख रकमेची पारितोषिकेही मिळणार आहेत. जानेवारी २०१९ मध्ये या स्पर्धेची प्राथमिक फेरी पुणे शहरासह कोथरूड, कात्रज आणि पुणे स्टेशन या ठिकाणी होणार आहे. या फेरीतून निवडलेल्या १२ विजेत्यांची अंतिम फेरी दोन फेब्रुवारीला पुण्यातील आयएलएस विधी महाविद्यालयाच्या मैदानावर संध्याकाळी ६.३० वाजता होईल. या अंतिम फेरीत अतुल खत्री व अभिजित गांगुली हे प्रसिद्ध ‘स्टँडअप कॉमेडी’ कलाकार या स्पर्धेत आपली कला सादर करतील. स्पर्धेतील विजेत्यास रोख पारितोषिकेही दिली जाणार असून, सर्वोत्तम विनोदी महिला कलाकारास रोख रकमेचे विशेष पारितोषिक दिले जाणार आहे.’

युवा पिढीला विविध क्षेत्रांत विकासाच्या संधी मिळाव्यात या उद्देशाने पवार यांनी सुरू केलेल्या सृजन अभियानाने आजवर कबड्डी, भजन, क्रिकेट, बॉक्सिंग यांसारख्या स्पर्धांसह सृजन उद्योजकता विकास कौशल्य मोहिमेद्वारे सव्वाशेहून अधिक उद्योजकही घडवले आहेत. आजच्या तरुणाईचे प्रश्न सोडविण्यासाठी हे अभियान सातत्याने क्रियाशील असते, याच क्रियाशीलतेतून विनोदाला प्रतिष्ठा मिळवून देणारा व स्थानिक विनोदी कलाकारांना मोठे व्यासपीठ मिळवून देणारा हा आगळावेगळा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link