Next
विखे-पाटील स्कूलची सहल ‘इस्रो’च्या केंद्रात
BOI
Friday, May 03, 2019 | 04:49 PM
15 0 0
Share this article:पुणे :
पुण्यातील डॉ. विखे-पाटील फाउंडेशनच्या विखे-पाटील मेमोरियल स्कूलच्या विद्यार्थ्यांची सहल नुकतीच गुजरातमध्ये नेण्यात आली होती. त्या वेळी भारतीय अवकाश संशोधन संस्था अर्थात ‘इस्रो’च्या अहमदाबादमधील विक्रम साराभाई स्पेस एक्झिबिशन सेंटरसह अनेक महत्त्वाच्या ठिकाणी विद्यार्थ्यांनी भेट दिली.

 १८ ते २२ एप्रिल २०१९ या कालावधीत ही सहल आयोजित करण्यात आली होती. ८४ विद्यार्थी आणि आठ शिक्षकांनी यात सहभाग घेतला होता. गांधीजींची साधी राहणी, त्यांचे आचार-विचार विद्यार्थ्यांना समजावेत यासाठी गांधीजींच्या स्मृती जपणाऱ्या साबरमती आश्रमाला भेट देण्यात आली. गुजरात सायन्स सिटीमधील हॉल ऑफ स्पेस, एनर्जी पार्क, लाइफ सायन्स पार्क या ठिकाणांना भेट देण्यात आली. तेथील विविध गोष्टी विद्यार्थ्यांनी जाणून घेतल्या. म्युझिकल फाउंटन, आकाशगंगा, ब्रह्मांडाचा अनुभव इत्यादींचा आनंद मुलांनी लुटला. त्याशिवाय व्हिंटेज कार संग्रहालयासह जिंदाल डेनिम टेक्स्टाइल, हॅवमोर आइस्क्रीम यांसारख्या मोठ्या कंपन्यांना भेट देऊन तेथील कामकाज मुलांना समजावून सांगण्यात आले. तेथील आइस्क्रीमचाही त्यांनी आस्वाद घेतला. हॉटेलमधील डीजेचाही आनंद मुलांनी घेतला. ‘इस्रो’चे विक्रम साराभाई स्पेस एक्झिबिशन सेंटर हे सहलीतील मुख्य ठिकाण होते. येथे गेल्यावर एखादे स्वप्न पूर्णत्वास गेल्याचा आनंद विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांनाही झाला. विद्यार्थी अत्यंत उत्साहात होते. या केंद्रात वेगवेगळ्या उपग्रहांची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली. उपग्रह ज्या यानातून अवकाशात सोडला जातो, त्याचीही माहिती देण्यात आली. आपल्या देशाने अवकाशात घेतलेल्या उत्तुंग भरारीची माहिती घेताना सारे जण भारावून गेले होते. मंगळयानावरील एक छोटा थ्रीडी चित्रपटही दाखवण्यात आला. त्यामुळे मंगळाबद्दलच्या विस्तृत माहितीची दालनेच उघडी झाली आणि विद्यार्थ्यांना नव्या विश्वाची ओळख झाली. अक्षरधाम मंदिर आणि कांकरिया तलावाला दिलेल्या भेटीही संस्मरणीय ठरल्या, असे शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी सांगितले. ‘या सहलीनंतर विद्यार्थ्यांना नव्या विश्वाची झालेली ओळख, जबाबदारीची झालेली जाणीव त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी उपयोगी ठरेल. तीन दिवसांत खूप गोष्टी त्यांना शिकता आल्या आणि त्यांनी भरपूर आनंदही घेतला,’ असे शिक्षकांनी सांगितले. मुख्याध्यापिका मृणालिनी यांच्या कल्पनेतून ही सहल आयोजित करण्यात आली होती. मोनिका मिश्रा, पौर्णिमा धारप, मोहिता कपूर, उपमुख्याध्यापक अमोल पाटील यांच्यासह रवी सरकार, संतोष सकपाळ, संतोष रणपिसे आणि उमेश कुलकर्णी असे आठ शिक्षक या सहलीत सहभागी झाले होते. ‘व्हीपीएमएस, लोहगाव’ येथूनही दोन शिक्षक आणि १२ विद्यार्थी या सहलीत सहभागी झाले होते.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search