Next
तिसरी आंतरराष्ट्रीय मधुमेह परिषद पुण्यात
चेलाराम हॉस्पिटल डायबेटीस केअर अँड मल्टीस्पेशालिटीतर्फे आयोजन
प्रेस रिलीज
Friday, February 22, 2019 | 04:42 PM
15 0 0
Share this article:



पुणे : चेलाराम हॉस्पिटल डायबेटीस केअर अँड मल्टीस्पेशालिटीतर्फे आठ ते १० मार्च २०१९ या कालावधीत पुण्यातील हॉटेल जेडब्लू मॅरीयेट येथे आंतरराष्ट्रीय मधुमेह परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. ही तिसरी आंतरराष्ट्रीय मधुमेह परिषद असून, याचे उद्घाटन नाशिकच्या महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिलीप म्हैसेकर यांच्या हस्ते होणार आहे.

भारतात मधुमेह होण्याची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. सध्या ७.४ कोटी भारतीय मधुमेहाने ग्रस्त आहेत. मधुमेहावर नियंत्रण न आणल्यास किडनी, नस, डोळे आणि हृदय याची हानी होते. मधुमेह व त्यामुळे होणारे विविध आजार व त्यावरील उपचार या विषयी चर्चा करण्यासाठी अनेक जागतिक कीर्तीचे तज्ज्ञ डॉक्टर व संशोधक या परिषदेमध्ये सहभागी होणार आहेत. या शिवाय यात कॅरोलिन्सका इन्स्टिटयूट, लुंड विश्वविद्यालय, ओरेब्रो (स्वीडन), मेयो क्लिनिक, व्हर्जिनिया विद्यापीठ आणि मियामी विद्यापीठ (यु.एस.ए), कार्डिफ विद्यापीठ व मॅन्चेस्टर विद्यापीठ (इंग्लंड) या नामवंत संस्थाही भाग घेणार आहेत. भारतातून ५० डाएबेटीस विशेषज्ञ व संशोधक आपले संशोधनपर निबंध सादर करणार असून, यापैकी एकाला चेलाराम फाउंडेशन डाएबेटीस रिसर्च अॅवॉर्ड व एक लाख रुपये देऊन सन्मानित केले जाणार आहे. त्याचबरोबर भारतातील एक हजार ५५० डॉक्टर्स परिषदेला उपस्थित राहणार आहेत.

‘चेलाराम हॉस्पिटल’चे अध्यक्ष लाल एल. चेलाराम म्हणाले, ‘चेलाराम मधुमेह संस्था नेहमीच मधुमेह आणि त्याची गुंतागुंत टाळण्यासाठी आघाडीवर राहिली आहे. या परिषदेद्वारे या क्षेत्रातील नवे ज्ञान मधुमेहाच्या क्षेत्रात काम करणाऱ्या तज्ञांपर्यंत पोहचविण्याचा आमच्या संस्थेचा प्रयत्न आहे. त्यामुळे मधुमेहाचे व त्याचे दुष्परिणाम त्यावरील उपचारांवर मोठा प्रभाव पडेल.’

‘चेलाराम हॉस्पिटल’चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. ए. जी. उन्नीकृष्णन म्हणाले, ‘या परिषदेनिमित्त जगभरातील विख्यात मधुमेह तज्ञ उपस्थित राहणार आहेत. पाश्चात्य देशांमध्ये मधुमेहाशी तुलना करता भारतात मधुमेह एक वेगळे आव्हान आहे. मला आशा आहे की, या परिषदेच्या माध्यमातून भारतातील मधुमेहामुळे ग्रस्त लाखो लोकांना नवीन उपाय मिळेल.’

‘चेलाराम हॉस्पिटल’चे मुख्य वैद्यकीय संचालक डॉ. (ब्रि) अनिल पंडित म्हणाले, ‘चेलाराम हॉस्पिटल डायबेटीस केअर अँड मल्टीस्पेशालिटी अत्याधुनिक सोई-सुविधांबरोबर पेडियाट्री डिपार्टमेंट, रिअल-टाइम रेग्युलर ग्लुकोज मॉनिटरिंग सिस्टम, इन्सुलिन पंप, बेरिएट्रिक सर्जरी, एंडोक्रायोलॉजी, हेमोडायलिसिस केंद्र यांसारखी उपकरणे व सुविधा उपलब्ध आहेत. याच बरोबर चेलाराम हे मल्टिस्पेशालिटी केअर असून, यामध्ये कॉम्प्रेहेन्सिव्ह ऑफथालमीक केअर व प्रगत रेडिओलॉजिकल इमेजिंग आदींचादेखील समावेश आहे.’

या परिषदेत मधुमेहामुळे होणारी ‘पायाची न्युरोपॅथी’ ही कार्यशाळा हे एक वैशिष्ट्यपूर्ण सत्र आहे. या कार्यशाळेत मधुमेही व्यक्तीचे पाय कसे तपासावेत, तसेच पायांच्या जखमा व व्रण यावर कसे उपचार करावेत याचे प्रत्यक्ष सादरीकरण केले जाणार आहे. कमी उष्माकांचा आहार व व्यायाम यांचा वजनामध्ये होणारी घट, तसेच मधुमेहापासून मुक्ती यांचा परस्पर संबंध या विषयी चर्चासत्र होणार आहे. तसेच या परिषदेत मधुमेहावरील नवीन उपचार, बेरिएट्रिक सर्जरी, पायातील जंतू संसर्गावरील नवीन उपचार औषधी, थायरॉइड ग्रंथीचे विकार, कन्टिन्यूअस ग्लुकोज मॉनिटरिंग यांवर चर्चा होणार आहे.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search