Next
‘जेएसडब्ल्यू’तर्फे ट्रक चालकांसाठी एड्स जनजागृती शिबिर
BOI
Tuesday, December 04, 2018 | 12:04 PM
15 0 0
Share this article:

रत्नागिरी तालुक्यातील चाफे येथील मोहिनी मुरारी मयेकर कला व वाणिज्य महाविद्यालयातर्फे एड्सविषयी जनजागृतीपार पथनाट्य सादर करताना विद्यार्थी

रत्नागिरी : तालुक्यातील जयगड येथील जेएसडब्ल्यू पोर्ट लिमिटेडतर्फे जागतिक एड्स दिनाचे औचित्य साधून एक डिसेंबर २०१८ रोजी ट्रक चालकांसाठी एड्स जनजागृती शिबिराचे आयोजन केले होते. रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालय आणि जिल्हा एड्स प्रतिबंधक नियंत्रण विभाग (डीएपीसीयू) यांच्या संयुक्त विद्यमाने ट्रक चालक व क्लीनर यांना मार्गदर्शन करण्यात आले.

जेएसडब्ल्यूच्या पार्किंग प्लॉटमध्ये झालेल्या या कार्यक्रमाला ‘डीएपीसीयू’चे समुपदेशक परमेश्वर भगत व श्री. खरात यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. या शिबिरात सुमारे ९५ जण सहभागी झाले होते.

या वेळी जेएसडब्ल्यू पोर्टचे युनिट हेड रवी चंदेर म्हणाले, ‘कोणत्याही आजारासंदर्भात आपण जाणून घेऊन त्यावर आपण काय करू शक्तू व आपण आपल्यात काय बदल केला पाहिजे याचा विचार करायला हवा. कोणत्याही आजाराची आपण जेवढ्या लवकर माहिती मिळवू तेवढी जास्त काळजी आपण घेऊ शकतो.’

जेएसडब्ल्यू मरीन व कार्गो विभागाचे प्रमुख रामडॉस वेट्रीवल म्हणाले, ‘पूर्वी एड्स हा शब्दही उच्चारण्यास लोक घाबरायचे पण आजची पिढी मुली-मुले हे सगळ्यांसमोर येऊन पथनाट्याद्वारे मार्गदर्शन करत आहेत. प्रत्येकाने आपल्या आरोग्याची काळजी घेणे हे स्वतःच्या कुटुंबाच्या व व्यवसायाच्या दृष्टीने गरजेचे आहे. शिवाय आरोग्याबाबत आपल्याला असलेले प्रश्न आपण स्वतःहून न घाबरता विचारले पाहिजेत.’या प्रसंगी चाफे येथील मोहिनी मुरारी मयेकर कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या आजीवन अध्ययन व विस्तार विभाग यांच्या सहकार्याने जनजागृतीपार पथनाट्य सादर करण्यात आले. यासाठी महाविद्यालयाच्या प्राचार्या सौ. पालये, प्रा. धावडे, प्रा. गावडे यांचे सहकार्य लाभले.

या शिबिरामध्ये विविध भित्तीचित्रे लावण्यात आली होती; तसेचे माहितीपुस्तिका वितरीत करण्यात आल्या. प्रत्यक्ष समुपदेशन आणि मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन जेएसडब्ल्यू पोर्टचे युनिट हेड चंदेर, सीएसआर विभागाचे सुधीर तैलंग यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. या वेळी मनुष्यबळ अधिकारी संदीप दायमा उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी लॉजिस्टिक विभागाचे समीर गायकवाड, सुरक्षा अधिकारी शिवप्रसाद गोरे, पार्किंग प्लॉटमधील सुरक्षा कर्मचारी यांसह सीएसआर विभागाच्या सई साळवी, योगिता महाकाळ आणि सनोबर सांगरे यांचे सहकार्य लाभले. 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search