Next
‘फोक्सवॅगन’ पुणे प्लांटची पर्यावरणपूरक वाटचाल
प्रेस रिलीज
Tuesday, April 24 | 02:19 PM
15 0 0
Share this story

पुणे : फोक्सवॅगन इंडियाने येथील प्लांटमध्ये पर्यावरणावर परिणाम करणाऱ्या उत्पादन प्रक्रियेत अथक प्रयत्नांनी घट साध्य केली असून, यामुळे अत्यंत परिणामकारक निकालाची नोंद करण्यात आली आहे. फोक्सवॅगन पुणे प्लांट २०१२पासून पर्यावरणपूरक उत्पादननिर्मितीसाठी प्रयत्नशील आहे आणि यातूनच पर्यावरणावर परिणाम करणाऱ्या उत्पादनांमध्ये ३१.१ टक्क्यांची घट करण्यात यश प्राप्त झाले आहे.

‘फोक्सवॅगन’ जगभरातील आपल्या साइटमधील सर्व उत्पादननिर्मितीमध्ये पर्यावरणपूरक उत्पादने घेण्याबाबत कटिबद्ध आहे. हे ध्येय प्राप्त करण्यासाठी ‘थिंक ब्लू. फॅक्टरी.’ हा उपक्रम प्रामुख्याने राबवण्यात आला होता. या उपक्रमाद्वारे ऊर्जेचा वापर, कार्बनडायऑक्साइडचे उत्सर्जन, पाण्याचा वापर, कचऱ्यातील घटक आणि विद्रावक उत्सर्जन या पाच प्रमुख गोष्टींवरून पर्यावरणावर उत्पादनांचा होणारा परिणाम मोजला जातो.

‘फोक्सवॅगन इंडिया’चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ. अँड्रिअस ल्युरमन म्हणाले की, ‘उत्तम कारची निर्मिती करण्यावर आमचा विश्वास आहेच; परंतु आम्ही त्यांचे उत्पादन कशा प्रकारे करतो, याकडे विशेष लक्ष देतो. आमच्या कारची निर्मिती पर्यावरणपूरक पद्धतीने व्हावी हेच आमचे ध्येय आहे.’

‘आम्ही हे धोरण स्वीकारले तेव्हापासून म्हणजेच साधारण सहा वर्षांपासून प्लांटमधील आमची टीम अथक कार्यरत आहे आणि यात त्यांना उत्तम यशही प्राप्त झालेले आहे. पुढील काही वर्षांसाठीही आम्ही याच दिशेने कार्यरत राहू आणि २०२५ सालापर्यंत अंतिम ध्येय साध्य करू, अशी आशा वाटते,’ असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

‘फोक्सवॅगन’च्या पुणे प्लांटचा पर्यावरणपूरक उत्पादननिर्मितीचा प्रवास, सर्व उत्पादने तसेच कार्यालये यांच्या अनेक प्रमाणांच्या अंमलबजावणीमधून झाला आहे. पुणे प्लांटमध्ये ‘थिंक ब्लू. फॅक्टरी.’ उपक्रमाअंतर्गत चालू असलेल्या अनेक महत्त्वाच्या प्रकल्पांमधून गेल्या वर्षात उत्तम प्रमाणात निकाल हाती आला आहे. यापैकी एका प्रकल्पात बाहेर सोडल्या जाणाऱ्या वायूंमधून ऊर्जा परत मिळवली जात आहे. पेंट शॉपमधील प्रायमर ओव्हनमधून बाहेर पडणारे वायू जमवण्यात येतात आणि या वायूंमधून ऊर्जा गोळा केली जाते, तिचा वापर करून पेंट बूथमधील सप्लाय युनिटला आसपासची तापलेली हवा पुरवली जाते.

गेल्या काही वर्षांत, बहुविविध प्रकल्प प्लांटमध्ये राबवण्यात आले आणि २०१७ सालच्या अखेरीस त्याचे एकत्रित योगदान दिसून आले. कँटीनमधील टाकाऊ अन्नपदार्थांपासून चालवलेला बायोगॅस प्लांट, पेंटिंगच्या प्रक्रियेत विद्रावक उत्सर्जन टाळण्यासाठी एकाच स्तरावरील थर देण्याचा निर्णय, चांगल्या परंतु कमी वेगाच्या फॅनचा वापर आणि कमीत कमी वीज घेणाऱ्या विद्युत उपकरणांचा वापर, पाण्यासाठी तोटीऐवजी अधिक सक्षम उपकरणांचा वापर आणि टाकाऊ पाणी पुन्हा वापरणे, प्लांटमधील निर्मितीच्या प्रक्रियेत पाण्याचा कमीत कमी वापर करणे आणि असे विविध प्रकल्प राबवण्यात आले आहेत.

‘फोक्सवॅगन’ एक जागतिक स्तरावरील माहितीची देवाण-घेवाण करणारे व्यासपीठसुद्धा झाले आहे. इतर प्लांटनीदेखील या गोष्टींचा स्वीकार करावा, यासाठी प्लांटमधील सर्वोत्तम सेवांची माहिती याद्वारे दिली जाते. यामुळे अन्य कुठल्याही फॅक्टरीला पर्यावरणपूरक नाविन्यपूर्ण उत्पादननिर्मिती शक्य होत आहे आणि त्याचा वापर इतर अनेकजण करू शकत आहेत. याशिवाय, पर्यावरणावरील परिणामांसाठी अधिक चांगल्या सक्षम संज्ञा राबवता याव्यात, यासाठी फोक्सवॅगन पुणे प्लांटने २०१८ साठीच्या प्रकल्पांची आखणीही केली आहे. विविध संकल्पना २०२५ सालापर्यंत राबवता याव्यात, यासाठी कार्यरत आहेत, ४५ टक्क्यांची घट करण्याचे अंतिम ध्येय प्राप्त करण्यासाठी कंपनीला याची मदत होईल.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link