Next
सीए दिनानिमित्त विविध उपक्रम
५९९ जणांनी केले रक्तदान
BOI
Tuesday, July 02, 2019 | 04:41 PM
15 0 0
Share this article:


पुणे : सनदी लेखापाल (सीए) स्थापना दिवसानिमित्त ‘दी इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया’च्या (आयसीएआय) वतीने सीए सप्ताह साजरा करण्यात आला. या सप्ताहाअंतर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यंदा ७० वा सीए स्थापना दिवस साजरा झाला. 

२७ जून ते १ जुलै यादरम्यान हा सप्ताह साजरा करण्यात आला. पालखी सोहळ्यात स्वच्छता अभियान, वारकऱ्यांना फराळाचे वाटप, गुंतवणुकदारांसाठी मार्गदर्शन सत्र, आर्थिक साक्षरता कार्यक्रम व करिअर मार्गदर्शन, रक्तदान शिबीरे, मुकुंदनगर ते बिबवेवाडी ‘नाईट मॅरेथॉन’, बिबवेवाडीतील शाळेच्या परिसरात १०५ रोपांचे वृक्षारोपण, आरोग्य आणि आहार यावर कार्यशाळा, मोफत आरोग्य तपासणी, अवयवदान जनजागृती कार्यक्रम यासह बॅडमिंटन, टेबल टेनिस, कॅरम, स्विमिंग, बुद्धिबळ अशा क्रीडा स्पर्धा घेण्यात आल्या. शहराच्या विविध भागात दहा ठिकाणी झालेल्या रक्तदान शिबिरांमध्ये तब्बल ५९९ जणांनी रक्तदान केले. रक्ताचे नाते चॅरिटेबल फाउंडेशनचे अध्यक्ष राम बांगड यांच्या हस्ते रक्तदान शिबिराचे उदघाट्न झाले. सीए सुहास बोरा यांच्या ‘एसपीसीएम’ येथे सर्वाधिक  १८० बाटल्या रक्तसंकलन झाले.


सीए विषयाचा अभ्यास करत असणारे विद्यार्थी, संस्थेचे सभासद, कर्मचारी यांनी सगळ्याच उपक्रमांत उल्लेखनीय सहभाग घेतला. ‘आयसीएआय’च्या केंद्रीय समितीचे सदस्य सीए चंद्रशेखर चितळे,  विभागीय समितीचे सदस्य सीए आनंद जाखोटिया, ‘आयसीएआय’ पुणेच्या अध्यक्षा सीए ऋता चितळे, उपाध्यक्ष सीए अभिषेक धामणे, सचिव सीए समीर लढ्ढा, खजिनदार सीए काशिनाथ पाठारे, सीए राजेश अगरवाल, सीए अमृता कुलकर्णी उपस्थित होते.


सीए ऋता चितळे म्हणाल्या, ‘यंदा सीए इन्स्टिट्यूट सत्तरावा वर्धापन दिवस साजरा करीत आहे. त्यानिमित्ताने विविध उपक्रमाचे आयोजन केले होते. सर्व सीए सभासद, विद्यार्थ्यांचा यामध्ये उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला. सीए दिवसरात्र एकत्र करून काम करतो. त्याच्या या कार्याच्या सन्मानासाठी नाईट मॅरेथॉन काढण्यात आली. अशा प्रकारची नाईट मॅरेथॉन प्रथमच काढण्यात आली.’
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search