Next
‘अनुराग नाट्यसंस्थेने कल्याणच्या सांस्कृतिक वैभवात भर घातली’
संस्थेच्या ४५व्या वर्धापनदिनानिमित नरेंद्र पवार यांचे प्रतिपादन
प्रेस रिलीज
Tuesday, June 25, 2019 | 05:00 PM
15 0 0
Share this article:


ठाणे : कल्याणच्या सांस्कृतिक वैभवात भर घालण्याचे काम व कलाकार निर्मितीचे काम अनुराग नाट्यसंस्थेने केले असल्याचे प्रतिपादन आमदार नरेंद्र पवार यांनी केले.

कल्याणच्या अनुराग या हौशी नाट्यसंस्थेचा ४५वा वर्धापनदिन सोहळा २३ जून २०१९ रोजी आचार्य अत्रे नाट्यगृहात रसिकांच्या उदंड उपस्थितीत पार पडला. या प्रसंगी प्रमुख पाहुणे पवार बोलत होते. या वेळी दैनिक जनमतचे संपादक तुषार राजे, संस्थेचे उदय वैद्य, मेघन गुप्ते उपस्थित होते. आपणही ‘अनुराग’चे विद्यार्थी असल्याचा अभिमान आहे, असे पवार यांनी सांगितले. पत्रकार तुषार राजे यांनी ‘अनुराग’ची ४५ वर्षांतील वाटचाल आपण पाहिली असल्याचे सांगितले. 


या प्रसंगी संस्थेच्या संगीत विभागातर्फे विद्या निकेतन संगीत विद्यालयाच्या केतकी बोरवणकर, अनिषा ठिगळे, निशिता खळदे यांनी कथ्थक नृत्य सादर केले. कथ्थक पढंत कविता अहिरे-बिऱ्हाडे यांनी केले. त्यानंतर शर्वरी धामापूरकर, रोजन मेढी, सुकांत जावडेकर यांचे बहारदार गायन झाले. त्यांना तबलासाथ स्नेहल धामापूरकर, हार्मोनियमसाथ अनिरुद्ध गोसावी व साइड ऱ्हिदमसाथ ओमकार जोशी यांनी दिली. 

संस्थेचे अध्यक्ष मेघन गुप्ते यांनी प्रास्ताविक सादर करून संस्थेच्या ४५ वर्षांतील कार्याचा आलेख सादर केला. प्राची गडकरी यांनी निवेदन केले. अभिनेत्री धनश्री ढोमसे यांनी आभार मानले.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search