Next
अमूल्यज्योती-केशववेणू महोत्सवाचे आयोजन
पं. पन्नालाल घोष यांच्या जयंतीनिमित्त उपक्रम
BOI
Tuesday, November 13, 2018 | 05:28 PM
15 0 0
Share this story

डॉ. पं. केशव गिंडेपुणे : भारतीय संगीतामध्ये आद्यवाद्य समजल्या जाणाऱ्या बासरीला भारतीय गायकीच्या जवळ नेणाऱ्या  आणि या वाद्यात अनेक सुधारणा करणाऱ्या पं. पन्नालाल घोष यांच्या जयंतीनिमित्त पुण्यातील अमूल्यज्योती आणि केशववेणू प्रतिष्ठान यांच्या वतीने अमूल्यज्योती-केशववेणू या संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या शनिवारी, दि.१७ नोव्हेंबर रोजी कर्नाटक हायस्कूल येथील शकुंतला शेट्टी सभागृहात सायंकाळी पाच वाजता हा  महोत्सव सुरू होणार आहे. महोत्सव सर्वांसाठी खुला आणि विनामूल्य असून, काही जागा निमंत्रितांसाठी राखीव असतील. 

या महोत्सवाविषयी माहिती देताना ज्येष्ठ बासरीवादक डॉ.  पं. केशव गिंडे यांचे शिष्य व केशववेणू प्रतिष्ठानचे अध्यक्ष दीपक भानुसे म्हणाले, ‘पं. पन्नालाल घोष हे मेहेर घराण्याच्या अल्लाऊद्दीन खाँ यांचे शिष्य होते. त्यांनी बासरीच्या प्रचार, प्रसाराबरोबरच त्यामध्ये संशोधन देखील केले. मेहेर घराण्याची हीच परंपरा डॉ. पं. केशव गिंडे यांनी सुरु ठेवली आहे. बासरी या आद्यवाद्याचा प्रचार, प्रसार, याबरोबरच त्यावर संशोधन होऊन त्याचे संवर्धन व्हावे हा या महोत्सवाचा मुख्य उद्देश आहे. दरवर्षी दोन दिवस या महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. यंदाचे हे तिसावे वर्ष आहे. या वर्षी महोत्सवाचे उद्घाटन ‘ऋतूचक्र’ या संकल्पनेने होणार आहे. यामध्ये ज्येष्ठ बासरीवादक डॉ. पं. केशव गिंडे यांच्या संकल्पनेतून सहा ऋतुंवरील १२ रागांचे सादरीकरण होईल. यामध्ये स्वत: डॉ. पं. केशव गिंडे आणि पं. राजेंद्र कुलकर्णी हे आपल्या १८ शिष्यांबरोबर बासरीवादन करतील. त्यांना अतुल कांबळे (तबला), गोविंद भिलारे (पखावज) आणि अमन वरखेडकर व आदित्य पवार (की बोर्ड) अशी साथसंगत असणार आहे. याबरोबर डॉ. पं. अरविंदकुमार आझाद व पं. आदित्य कल्याणपूर यांचे तबलावादन होईल. दिल्लीचे डॉ. पं. निशिंद्र किंजल्क यांचे सतारवादनही या वेळी होणार आहे. महोत्सवाची सांगता प्रसिद्ध बासरीवादक पं. पारसनाथ यांच्या बासरीवादनाने होईल.’

पं. राजेंद्र कुलकर्णी
‘याच महोत्सवात ज्येष्ठ बासरीवादक पं. अमरनाथ यांना पं. पन्नालाल घोष वेणूरत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात येईल. पुरस्काराचे हे सलग चौथे वर्ष असून, मानचिन्ह, मानपत्र, शाल, श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. याआधी पं. रोणू मुजुमदार, पं. राजेंद्र प्रसन्ना आणि पं. नित्यानंद हळदीपूर यांना हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी, दि. १८ नोव्हेंबर रोजी पं. पारसनाथ यांच्या विनामूल्य कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. ही कार्यशाळा बाणेर रस्त्यावरील हॉटेल साईसागरमागील सरगम पॅलेस येथे होणार असून, त्यासाठी इच्छुकांनी शनिवारी (दि. १७)  महोत्सवाच्या ठिकाणी नावनोंदणी करावी’, असेही भानुसे यांनी सांगितले. 

कार्यक्रमाविषयी 
अमूल्यज्योती- केशववेणू महोत्सव
स्थळ :  शकुंतला शेट्टी सभागृह, कर्नाटक हायस्कूल.
दिवस व वेळ : शनिवार,१७ नोव्हेंबर, संध्याकाळी : ५ वाजता.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link