Next
टाटा स्कायवर ‘मराठी सिनेमा’ सेवा
प्रेस रिलीज
Thursday, January 11 | 06:43 PM
15 0 0
Share this story

पुणे : मराठी सिनेमाप्रेमींना जाहिरातींच्या अडथळ्यांशिवाय आता विविध प्रकारचे मराठी सिनेमा,गाणी, नाटके एका बटणाच्या सहाय्याने पाहता येणार आहेत. टाटा स्कायने  ‘मराठी सिनेमा’ ही नवीन सेवा सादर केली असून याचे उद्घाटन अभिनेता स्वप्नील जोशीच्या हस्ते करण्यात आले. या वेळी टाटा स्कायचे चीफ कंटेंट ऑफिसर अरुण उन्नी आणि शेमरू एंटरटेनमेंट लिमिटेडचे हिरेन गाडा आदी मान्यवरही उपस्थित होते.

अगदी अल्प शुल्कात टाटा स्काय सारख्या दर्जेदार, विश्वासार्ह कंपनीने मराठी सिनेमा, नाटके, गाणी असा खजिना या सेवेद्वारे उपलब्ध केल्याने मराठी रसिकांना ही सुवर्णसंधी आहे. घरबसल्या मराठी चित्रपटांचा,नाटकांचा आस्वाद रसिकांना घेता येईल, त्यामुळे या सेवेला नक्कीच चांगला प्रतिसाद मिळेल, असा विश्वास स्वप्नील जोशी याने व्यक्त केला.  

‘प्रेक्षकांची प्रादेशिक सिनेमांची मागणी व स्वारस्य लक्षात घेऊनच आम्ही या सेवा सादर केल्या आहेत. मराठीतील सर्वोत्तम सिनेमे त्यांच्या चाहत्यांपर्यंत पोचवण्यासाठी आम्ही हे नवे उत्पादन सादर केले आहे. शेमरूबरोबर भागीदारीत ही सेवा सादर करण्यात आली असून, याद्वारे ग्राहकांना एकशेवीसपेक्षा जास्त सिनेमे, पाचशे गाणी आणि सर्वोत्तम अशी नाटके पाहायला मिळणार आहेत. प्रेक्षकांना दिवसभरात जाहिरातींच्या कुठल्याही अडथळ्यांशिवाय तीन सिनेमे पाहता येतील, तसेच दर रविवारी वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियरचाही आनंद घेता येणार आहे. ही सेवा १२०५ या क्रमांकावर उपलब्ध आहे’, असे टाटा स्कायचे चीफ कंटेंट ऑफिसर अरूण उन्नी यांनी सांगितले. 

या वेळी शेमरू एंटरटेन्मेंट लिमिटेडचे संचालक हिरेन गाडा  म्हणाले ‘या सेवेसाठी शेमरूच्या विशेष आणि निवडक संग्रहातून संहिता व कार्यक्रम सादर केले जातील. सिनेमाच्या चाहत्यांसाठी ही पर्वणीच आहे. आमच्या नव्या सेवेचाही प्रेक्षक आनंद लुटतील असा आम्हाला विश्वास वाटतो’.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link