Next
‘हळद कोकणासाठी पर्यायी पीक’
BOI
Saturday, March 31, 2018 | 05:18 PM
15 0 0
Share this article:

हळदीची माहिती देताना सचिन कारेकरगुहागर : ‘वानर-माकड व जंगली प्राण्यांपासून संरक्षित हळद पीक रत्नागिरी जिल्ह्यातच नव्हे, तर कोकणासाठी पर्यायी पीक म्हणून पुढे येत आहे. त्यामुळे या पिकासंबंधी योग्य तांत्रिक माहिती घेणे गरजेचे आहे,’ असे प्रतिपादन गुहागर पंचायत समितीचे कृषी विस्तार अधिकारी बी. बी. पाटील यांनी शेतकऱ्यांना दिला.

आबलोली येथील गारवा कृषी पर्यटन केंद्रात नुकतेच व्यावसायिक हळद लागवडीबाबत प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. या प्रशिक्षणात गुहागर तालुक्यासह जिल्ह्यातून ७५ प्रशिक्षणार्थी शेतकरी उपस्थित होते.

या वेळी कृषी विस्तार अधिकारी पाटील यांनी नैसर्गिक पद्धतीने हळद लागवडीबाबतचे अनुभव उपस्थितांसमोर मांडले. या वेळी एसके-४ (स्पेशल कोकण-४) हे हळदीचे वाण विकसित कारणारे सचिन कारेकर, गजेंद्र पौनीकर उपस्थित होते.

‘एसके-४’ या हळदीच्या वाणाची गुहागर, चिपळूण तालुक्यासह रत्नागिरी जिल्ह्यात सुमारे सात एकर क्षेत्रावर लागवड होणार आहे. यापैकी दोन एकर क्षेत्रावर झीरो बजेट नैसर्गिक पद्धतीने लागवड करण्यात येणार आहे.

‘एसके-४’ या वाणाची प्रो-ट्रेमध्ये तब्बल ५० हजार रोपे गुहागर तालुक्यातील व तालुक्याबाहेरील शेतकऱ्यांना उपलब्ध होणार असल्याची माहिती सचिन कारेकर यांनी या वेळी दिली. ते म्हणाले, ‘हळद लागवडीमध्ये बियाण्याची निवड हा मुद्दा अतिशय महत्त्वाचा  असून, शेतकऱ्यांपर्यंत हळदीची ‘एसके-४’ ही उत्तम जात पोहचविण्यासाठी आम्ही प्रयत्नात आहोत. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या हळकुंडापासून रोपे निर्माण करण्याच्या तंत्राने आम्ही सुमारे ५० हजार रोपे प्रो-ट्रेमध्ये तयार करणार आहोत.’

शेतकऱ्यांना हळद लागवडीसंबंधी तांत्रिक मार्गदर्शन मिळावे या हेतूनेच हे प्रशिक्षण आयोजित केल्याचे कारेकर यांनी या वेळी सांगितले.

दरम्यान, कृषी विस्तार अधिकारी बी. बी. पाटील व गजेंद्र पौनीकर यांच्या माग॔दर्शनाखाली प्रो-ट्रेमध्ये हळकुंडापासून रोपे तयार करण्यात येणार आहेत. ही रोपे १० ते १५ जूनदरम्यान उपलब्ध होणार आहे. सुमारे पाच एकर क्षेत्रावर रोपांपासून व दोन एकर क्षेत्रावर कंदापासून लागवड करण्यात येणार आहे. या वेळी गजेंद्र पौनीकर यांनी हळकुंडापासून रोपे तयार करण्याबाबतची माहिती देवून प्रत्यक्ष प्रात्यक्षिक दाखवले.
       
प्रशिक्षणार्थींपैकी नाखरे गावातील प्रगतीशील शेतकरी विनायक भाटकर यांनी शेतकऱ्यांतर्फे मनोगत व्यक्त करताना सांगितले की, ‘आम्ही गेली काही वर्ष हळद लागवड करतो; पण त्यात होणाऱ्या आमच्या चुका आम्हाला या प्रशिक्षणातून समजल्या.’

रत्नागिरी पंचायत समितीचे माजी सदस्य संदीप बने यांनी या प्रशिक्षण स्थळाला आवर्जून भेट दिली. पालशेत येथील मंगेश घाणेकर यांनी ‘एसके-४’ हळदीचा दोन किलो २०० ग्रॅमचा गड्डा उत्पादित केल्याबद्दल कारेकर यांच्यातर्फे त्यांना एक हजार एक रुपयांचे बक्षीस माजी पंचायत समिती सदस्य बने यांच्या हस्ते देण्यात आले.

प्रशिक्षणात सहभागी झालेले शेतकरी
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search