Next
‘पाणी फाउंडेशन’च्या महाश्रमदानात ‘एचडीएफसी’चे जलमित्र सहभागी
प्रेस रिलीज
Wednesday, May 08, 2019 | 01:40 PM
15 0 0
Share this article:


पुणे : महाराष्ट्र या वर्षी तीव्र दुष्काळाला सामोरे जात असताना, महाराष्ट्रातील २४ जिल्ह्यांमधील दुष्काळग्रस्त गावांमध्ये होत असलेल्या ‘सत्यमेव जयते वॉटरकप २०१९’ स्पर्धेच्या महाश्रदानामध्ये ‘एचडीएफसी’ समूहातील मुंबई, औरंगाबाद, पुणे, नागपूर आणि नाशिक येथील ५०० जलमित्र सहभागी झाले होते. गेल्या वर्षी ‘एचडीएफसी’च्या शाखांतील ३४० कर्मचार्‍यांनी या उपक्रमामध्ये भाग घेतला होता. 


या प्रसंगी बोलताना ‘एचडीएफसी लिमिटेड’चे अध्यक्ष दीपक पारेख म्हणाले, ‘गेल्या चार वर्षांत पाणी फाउंडेशनची व्याप्ती तीनपासून ७६ तालुक्यांपर्यंत विस्तारली असून, याचे कार्य चार हजार गावांपर्यंत पोहचले आहे. पाणी संवर्धन व्यवस्थापनामध्ये लोकांना प्रशिक्षित करून त्यांचे प्रश्‍न स्वत: सोडविण्यासाठी सक्षम बनविणे हे पाणी फाउंडेशनच्या कार्याचे मुख्य ध्येय आहे. केवळ संस्थात्मक पातळीवर नव्हे, तर वैयक्तिक पातळीवरदेखील दर वर्षी आमचे कर्मचारी अधिक मोठ्या संख्येने सहभागी होऊन या लक्षणीय लोक चळवळीमध्ये आपले योगदान देत आहेत. हे बघून मला अत्यंत आनंद होत आहे.’

‘एचडीएफसी’चे कर्मचारी श्रमदानासाठी गराडे (पुणे), धोंडबार (नाशिक), खरसोळी (नागपूर) व खांडी पिंपळगाव (औरंगाबाद) येथे सहभागी झाले होते.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search