Next
पुण्यात राष्ट्रीय चित्रकला स्पर्धेचे आयोजन
‘गो ग्रीन-से नो टू प्लास्टिक’ संकल्पनेवर आधारित स्पर्धा
प्रेस रिलीज
Saturday, December 22, 2018 | 12:06 PM
15 0 0
Share this story

पत्रकार परिषदेत माहिती देताना डावीकडून श्रीकांत जोशी, मुकुंद पात्रीकर, मंजुषा वैद्य व दया कुलकर्णी

पुणे : सुपरमाइंड फाउंडेशन, रोटरी क्लब ऑफ युवा, नागपूर येथील नटराज निकेतन व सामवेद इंटरनॅशनल यांच्या संयुक्त विद्यमाने प्लास्टिकबंदी व प्लास्टिकऐवजी पर्यायी नैसर्गिक घटकांच्या वापरातून ‘गो ग्रीन- से नो टू प्लास्टिक’ संकल्पनेवर आधारित आंतरराष्ट्रीय स्तरावरील चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा पाच जानेवारी २०१९ रोजी पुण्यातील मुकुंदनगर येथील कटारिया हायस्कूल येथे सकाळी नऊ ते १० या वेळेत होईल.

या राष्ट्रीय चित्रकला स्पर्धेमध्ये प्रसिद्ध कार्टूनिस्ट चारुहास पंडित सुपारीच्या पानांपासून बनविलेल्या प्लेटवर पहिले चित्र काढून स्पर्धेची सुरुवात करणार आहेत. या वेळी आमदार मेधा कुलकर्णी, पुण्याचे पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशन, सहपोलीस आयुक्त शिवाजी बोडके, ज्येष्ठ नगरसेवक आबा बागुल यांच्यासह पुण्यातील अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

या स्पर्धेत चित्र काढण्यासाठी कागदाऐवजी सुपारीच्या पानापासून बनविलेल्या प्लेटचा वापर केला जाणार आहे. त्यामुळे ही चित्रकला स्पर्धा जगातील आगळीवेगळी स्पर्धा ठरणार आहे. एशिया बुक ऑफ रेकॉर्ड व इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड यांच्यातर्फे या स्पर्धेची दखल घेतली जाणार आहे. स्पर्धेसाठी येणार्‍या शालेय विद्यार्थी स्पर्धकांना विनामूल्य प्लेट देण्यात येईल.

ही स्पर्धा भारतामध्ये दिल्ली, मुंबई, पुणे, मध्यप्रदेश, छत्तीसगड यांसह देशातील अनेक प्रमुख शहरांच्या ठिकाणी एकाच वेळी घेण्यात येणार आहे. वेगवेगळ्या वयोगटांसाठी वेगवेगळे विषय दिले जाणार आहेत. यात प्रामुख्याने गट ए, बी, सी, डी, इ, एफ अशा सहा गटांमध्ये वर्गीकरण करण्यात आले आहे. कोणतेही फळ किंवा फुल, आवडता ऋतू, निसर्गचित्र-दृश्य, जग वाचवा-पृथ्वी वाचवा, एकता-अनेकता-एकतेचे बळ, टीम वर्क अशा संकल्पनेवर ही चित्रे असणार आहेत. चित्रकला स्पर्धेचा निकाल त्याच दिवशी जाहीर केला जाणार असून, पहिल्या दहा चित्रांना मान्यवरांच्या हस्ते विशेष भेटवस्तू व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे; तसेच स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट चित्रांचे प्रदर्शनही आयोजित केले जाणार आहे. सर्व सहभागी स्पर्धकांना, तसेच सहभागी शाळांना वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डतर्फे प्रमाणपत्र दिले जाणार आहे.
 
‘सर्व शाळांनी आपल्या जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना या स्पर्धेत सहभागी करून घ्यावे व ‘प्लास्टिकचा वापर टाळा व त्या ऐवजी नैसर्गिक घटकांचा वापर करा’ असा संदेश अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचवावा,’ असे आवाहन ‘सुपरमाइंड’च्या मंजुषा वैद्य, दया कुलकर्णी, ‘सामवेद’चे मुकुंद पात्रीकर, रोटरी क्लबचे श्रीकांत जोशी यांनी केले आहे.

स्पर्धेविषयी :
दिवस :
पाच जानेवारी २०१९
वेळ : सकाळी नऊ ते १०
स्थळ : कटारिया हायस्कूल, मुकुंदनगर, पुणे.
नावनोंदणीसाठी : www.supermindfoundation.org
संपर्क : ९०४९९ ९२८०९/७
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link