Next
‘केपीआयटी स्पार्कल’साठी संघांची घोषणा
प्रेस रिलीज
Tuesday, February 06, 2018 | 06:06 PM
15 0 0
Share this article:

पुणे : केपीआयटी टेक्नोलॉजीज या उत्पादन अभियांत्रिकी (प्रोडक्ट इंजिनीअरिंग) आणि माहिती तंत्रज्ञान सल्लागार (आयटी कन्सल्टिंग) क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या जागतिक दर्जाच्या टेक्नॉलॉजी कंपनीतर्फे ‘केपीआयटी स्पार्कल’ स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी निवड झालेल्या ३० संघांची घोषणा करण्यात आली.

ही स्पर्धा राष्ट्रीय पातळीवर दरवर्षी आयोजित केली जाते. डिझाइन आणि डेव्हलपमेंटशी निगडित असलेल्या क्षेत्रांमधील वास्तवातील समस्यांवर उपाय शोधण्यासाठी नाविन्यपूर्ण संस्कृती आणि चाकोरीबाहेरील विचार करण्याला चालना देणे हा या स्पर्धेचा उद्देश आहे.

‘केपीआयटी स्पार्कल २०१८’साठी भारत सरकारचा विज्ञान व तंत्रज्ञान विभाग माहिती भागीदार आहे. या स्पर्धेसाठी ऊर्जा, दळवळण क्षेत्रासाठी आर्टिफिशिअल इंटेलिजन्स, नवी साधने (मटेरिअल) आणि सायबरसिक्युरिटीची वापर करून हरित, सुरक्षित आणि वापरकर्त्यासाठी सुलभ असलेली उत्पादने विकसित करण्ये आव्हान विद्यार्थ्यांसमोर आहे.

या स्पर्धेच्या पात्रतापूर्व फेरीत भारतभरातील अभियांत्रिकी आणि विज्ञान महाविद्यालयांतून १२ हजारांहून अधिक प्रवेशिका प्राप्त झाल्या. त्यापैकी एक हजार ५००हून अधिक  संघांमधून नाविन्यता, वाजवी खर्च आणि व्यवहार्यतेच्या निकषांवर ३० संघांची निवड करण्यात आली.

केपीआयटी स्पार्कल हा कंपनीच्या इनोव्हेशन कौन्सिलचा उपक्रम आहे. कंपनीच्या अंतर्गत कामकाजात आणि बाह्यव्यवहारांमध्ये नाविन्यतेवर भर देणाऱ्या ‘केपीआयटी’ कंपनीच्या संचालक मंडळाचे सदस्य असलेले डॉ. आर. ए. माशेलकर या कौन्सिलचे अध्यक्ष आहेत. प्रसिद्ध तज्ज्ञ, तंत्रज्ञान चिकित्सक, विद्वान आणि अग्रणी उद्योजक या प्रकल्पांचे परीक्षण करतील.

‘केपीआयटी’चे सहसंस्थापक, अध्यक्ष आणि समूह मुख्य कार्यकारी अधिकारी रवी पंडीत म्हणाले, ‘भारत ही अत्यंत वेगाने विकसित होणारी ज्ञानाधारित अर्थव्यवस्था आहे. या अर्थव्यवस्थेला तंत्रज्ञान, नाविन्यता आणि खंबीर उद्योजकतेच्या संस्कृतीने चालना मिळत आहे. ‘केपीआयटी स्पार्कल’च्या माध्यमातून आपल्या देशातील तरुणांना त्यांच्यातील अभियांत्रिकी, उत्पादन संरचना आणि तंत्रज्ञानाबाबत असलेल्या अंगभूत कौशल्याचा वापर करून अधिक शाश्वत भविष्यकाळाच्या दृष्टीने उपाययोजना निर्माण करण्यासाठी प्रेरणा देण्यात येते.’

अंतिम फेरीसाठी निवड झालेले स्पर्धक त्यांचे प्रकल्प एका भव्य सार्वजनिक प्रदर्शनात सादर करतील. या स्पर्धेचा शैक्षणिक भागीदार असलेल्या पुण्यातील आकुर्डी येथील पिंपरी-चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग (PCCOE) यांच्यातर्फे १८ फेब्रुवारी २०१८ रोजी हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनात स्पर्धक क्रियाशील प्रतिकृती किंवा वास्तवातील प्रारूपे सादर करतील.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search