Next
‘डीकेटीई’ व ‘एसआयसीडी’मार्फत मार्गदर्शन शिबिर
प्रेस रिलीज
Tuesday, June 05, 2018 | 10:51 AM
15 0 0
Share this story

इचलकरंजी : येथील डीकेटीई सोसायटीचे टेक्स्टाईल अ‍ॅंड  इंजिनीअरिंग इन्स्टिट्यूट व श्रद्धा इन्स्टिट्यूट ऑफ करिअर डेव्हलपमेंट यांच्या संयुक्त विद्यमाने बारावी शास्त्र शाखा उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी इंजिनीअरिंग प्रथम वर्ष अभियांत्रिकी प्रवेश मार्गदर्शन शिबिराचे आयोजन केले आहे. हे शिबिर येथील घोरपडे नाट्यगृहात सात जून २०१८ रोजी सकाळी १० ते दुपारी एक या वेळेत होईल.

यामध्ये विद्यार्थी व पालकांच्या प्रथम वर्ष अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेसंबंधीच्या सर्व शंकांचे निरसन करण्यासाठी तज्ज्ञ वक्त्यांचे मार्गदर्शन आयोजित केले आहे. बारावीनंतर इंजिनीअरिंग प्रवेश प्रक्रियेदरम्यान विदयार्थी व पालक यांना या प्रवेशप्रक्रियेतील टप्प्यांदरम्यान होणाऱ्या चुका व गैरसमजुती कशा टाळाव्यात, तसेच चालू वर्षीच्या प्रवेश प्रक्रियेतील वेगळेपणा या मुद्द्यांची सखोल माहिती देण्यासाठी ‘डीकेटीई’तील तज्ज्ञ प्राध्यापक यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.

यामध्ये प्रवेश प्रक्रियेमधील विविध टप्पे, इंजिनीअरिंगच्या विविध शाखा व त्यामधील संधी, प्रवेश प्रक्रियेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे, विविध शिष्यवृत्त्या व फी सवलत तसेच इंजिनीअरिंग शाखा निवड पर्याय व पद्धती या संदर्भात विस्तृत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. याचबरोबर सर्व उपस्थित विद्यार्थ्यांना कट-ऑफ पुस्तिकाही देण्यात येणार आहे.

अभियांत्रिकीच्या प्रवेश प्रक्रियेच्या विविध फेऱ्या व त्यांच्या नियमाबद्दल विद्यार्थी व पालकांना पुरेशी माहिती नसते. त्यामुळे करिअर निवडताना संभ्रमावस्था निर्माण होते.  त्यामुळेच विद्यार्थी व पालकांना प्रथम वर्ष अभियांत्रिकीच्या प्रवेश प्रक्रियेबद्दल विस्तृतपणे माहिती या कार्यक्रमामध्ये देण्यात येणार आहे.

‘या मार्गदर्शन शिबिराचा लाभ इच्छुक विद्यार्थी व त्यांच्या पालकांनी मोठ्या संख्येने घ्यावा,’ असे आवाहन इन्स्टिट्यूटचे संचालक प्रा. डॉ. पी. व्ही. कडोले यांनी केले आहे.  

शिबिराविषयी :
दिवस : गुरुवार, सात जून २०१८  
वेळ : सकाळी १० ते दुपारी एक
स्थळ : घोरपडे नाट्यगृह, इचलकरंजी
संपर्क : प्रा. डॉ. ए. के. घाटगे ९४२१२ ०७२७६
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link