Next
क्लिअरटॅक्स आयकर विवरण सुविधा आता शाओमीच्या कॅलेंडर अॅपवर
प्रेस रिलीज
Thursday, July 26, 2018 | 05:42 PM
15 0 0
Share this article:

मुंबई : आयकर विवरणपत्र सादर करण्याची ३१ जुलै ही शेवटची तारीख जवळ येत असतानाच ‘क्लिअरटॅक्स’ ने विवरणपत्र सादर करण्याची सुविधा शाओमी या एमआययूआय प्रणालीवर चालणाऱ्या स्मार्टफोनच्या एमआय कॅलेंडर अॅपवरही उपलब्ध केली आहे. येथील अॅपवर ग्राहकांना त्यांचे आयकर विवरणपत्र आता थेट सादर करता येणार आहे. ई-फायलिंगचे संकेतस्थळ आता एमआय कॅलेंडर अॅपवर ३१ जुलै या वित्तीय वर्ष २०१७-१८चे विवरणपत्र सादर करण्याच्या शेवटच्या तारखेवर क्लिक करून उघडता येईल.  

याबाबत क्लिअरटॅक्सचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अर्चित गुप्ता म्हणाले, ‘ई-फायलिंग प्रक्रिया ग्राहकांसाठी जास्तीत-जास्त सुलभ करणे हे नेहमीच क्लिअरटॅक्सचे उद्दिष्ट राहिले आहे. भारतातील शाओमी ग्राहकांची प्रचंड संख्या लक्षात घेता, ही सुविधा खूप लोकांसाठी सोयीस्कर ठरेल. त्यांना त्यांची आयकर विवरणपत्रे आता एमआय कॅलेंडर अॅपवरून सहज सादर करणे शक्य होणार आहे.’   

कॅलेंडर अॅपवर ३१ जुलै २०१८ रोजी फक्त क्लिक करून ग्राहकांना आयकर विवरणपत्राचा पर्याय निवडता येईल. त्यानंतर ग्राहकांना एका वेगळ्या पानावर जाता येईल, जेथून त्यांना त्यांचे आयकर विवरणपत्र स्वतः विनामुल्य सादर करता येईल  किंवा चार्टर्ड अकौंटंटच्या सहकार्याने आपले विवरणपत्र भरता येईल. आयकरविषयक सर्वसमावेशक माहितीही मिळवता येईल.क्लिअरटॅक्सवरून पगारदार करदात्यांना विवरणपत्र सादर करण्यासाठी फक्त त्यांचा फॉर्म १६ अपलोड करायचा आहे. क्लिअरटॅक्स सॉफ्टवेअर त्या फॉर्म १६ मधील माहिती टिपून घेते आणि सर्व गाळलेल्या जागा स्वतः भरते. ग्राहकांनी फक्त ही सर्व माहिती पुन्हा तपासून घ्यायची आहे आणि ई-फाईलचा पर्याय निवडायचा आहे. ज्यांच्याकडे फॉर्म १६ नसेल, किंवा एकाहून जास्त फॉर्म १६ असतील किंवा दीर्घ मुदतीच्या भांडवली नफ्यावर कर भरायचा असेल तर त्यांनी चार्टर्ड अकौंटंटची मदत उपलब्ध असलेले आणि त्यांच्या गरजेनुरूप असलेले पर्याय निवडावेत, जे अत्यल्प शुल्क भरून उपलब्ध आहेत. एमआय कॅलेंडर अॅप ग्राहकांना क्लिअरटॅक्सच्या म्युच्युअल फंड मंचावरून म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्यातही सहाय्य करते. 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search