Next
रोटरी इंटरनॅशनलतर्फे ‘पॉल हॅरिस फेलोशिप’चे वितरण
प्रेस रिलीज
Thursday, April 26 | 05:20 PM
15 0 0
Share this story

रोटरी इंटरनॅशनलच्या ‘पॉल हॅरिस फेलोशिप’ वितरण सोहळ्यात मार्गदर्शन करताना डॉ. शां. ब. मुजुमदार.

पुणे : ‘समाजातील वंचित घटकांच्या विकासासाठी रोटरी इंटरनॅशनल करीत असलेले कार्य कौतुकास्पद आहे. वंचितांना शिक्षण, आरोग्य, रोजगार, कौशल्य विकास सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रत्येकाने ‘वसुधैव कुटुंबकम’ या भावनेतून काम करायला हवे. समाजातील प्रत्येक घटक आपल्याच कुटुंबाचा सदस्य असल्याची भावना रुजवायला हवी’, असे प्रतिपादन ज्येष्ठ शिक्षण तज्ज्ञ आणि सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाचे संस्थापक डॉ. शां. ब. मुजुमदार यांनी केले.

रोटरी इंटरनॅशनल व बाहरी बी. आर. मल्होत्रा यांच्या वतीने डॉ. मुजुमदार यांच्या हस्ते विविध क्षेत्रात योगदान दिलेल्या व्यक्तींना ‘पॉल हॅरिस फेलोशिप’ प्रदान करण्यात आली. या वेळी रोटरीचे प्रभारी अध्यक्ष रवी धोत्रे, प्रशांत देशमुख, डॉ. जयसिंग पाटील, बाहरी बी. आर. मल्होत्रा, जानकी मल्होत्रा, जेनीस सोमजी आदी उपस्थित होते. डॉ. विनोद शहा, डॉ. संजय चोरडिया, एडिसन सामराज, अरुणा कटारा, राजेंद्र जगताप, डॉ. पराग संचेती यांच्यासह पन्नास जणांना ‘पॉल हॅरिस फेलोशिप’ देऊन सन्मानित करण्यात आले.

डॉ. मुजुमदार म्हणाले, ‘माझ्यासाठी रोटरी क्लब ही संस्था आधारवड आहे. जगभर पसरलेल्या या संस्थेमुळे माझ्या जडणघडणीत मोठी मदत झाली. पोलिओसारख्या आजाराला हद्दपार करण्यात रोटरीचे योगदान मोलाचे आहे. समाजसेवेच्या भावनेने काम करणारी ही जगातील एक मोठी संस्था आहे. साक्षरतेबाबत रोटरी करीत असलेले काम प्रेरणादायी आहे.’

रवी धोत्रे म्हणाले, ‘कोणत्याही लोभाशिवाय रोटरी निरंतर काम करीत आहे. १२ लाखांहून अधिक सभासद जगभर पसरले असून, समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी नि:स्पृहपणे काम सुरु आहे. प्रत्येक घटकापर्यंत शिक्षण पोहोचावे यासाठी येत्या काळात प्रयत्न केले जाणार आहेत.’ 

बाहरी बी. आर. मल्होत्रा यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले. डॉ. जयसिंग पाटील यांनी प्रास्ताविक केले. जेनीस सोमजी यांनी सूत्रसंचालन केले. अरविंद सराफ यांनी आभार मानले.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link