Next
‘मित्राहटॉक्स’मध्ये सोनम वांगचुक यांचे व्याख्यान
BOI
Wednesday, October 17, 2018 | 03:41 PM
15 0 0
Share this article:

‘मित्राहटॉक्स’ कार्यक्रमात बोलताना सोनम वांगचुकपुणे : ‘जगाला वातावरण बदलाच्या संकटामुळे निर्माण होणाऱ्या समस्यांशी झुंजावे लागत आहे. आपली शाश्वत विकासाची ध्येय साध्य करण्यासाठी प्रत्येकाने आपल्या कामांसाठी नवीकरणीय ऊर्जेचा वापर करावा’, असे आवाहन शिक्षणक्षेत्रातील सुधारक,  रॅमन मॅगसेसे पुरस्कार विजेते सोनम वांगचुक यांनी विद्यार्थ्यांना केले. 

मित्राह एनर्जी (इंडिया) प्रा. लि. (एमईआयपीएल) या स्वतंत्र वीज उत्पादक कंपनीतर्फे आयोजित ‘मित्राहटॉक्स’ कार्यक्रमात ते बोलत होते. सिम्बायोसिस इन्स्टिट्यूट ऑफ इंटरनॅशनल बिझनेस (एसआयआयबी) येथे झालेल्या या कार्यक्रमात ‘मित्रा एनर्जी’मधील स्ट्रॅटजिक इनिशिएटिव्ह्जचे प्रमुख आर. सोमसुंदरम, एसआयआयबीमधील उर्जा व पर्यावरण विषयाचे प्राध्यापक दिपेन पॉल यांच्यासह या क्षेत्रातील तज्ज्ञ, तसेच ४०० विद्यार्थी सहभागी झाले होते. 


भारतातील नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रात उत्पादन, प्रकल्प विकास आणि संबंधित सेवांमध्ये मोठ्या प्रमाणावर भांडवली गुंतवणूक झाल्यामुळे तरुणांसाठी या क्षेत्रामध्ये रोजगारसंधी वाढल्या आहेत. या क्षेत्राबद्दल माहिती देण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

सोनम वांगचुक पुढे म्हणाले, ‘पर्यायी ऊर्जा हा न थांबवता येण्यासारखा प्रवाह आहे. आपल्या तरुणांनी ही संधी साधून जागतिक पातळीवर भारताचा ठसा उमटविण्यासाठी प्रयत्न केला  पाहिजे. हे ध्येय वास्तवात उतरविण्यासाठी मित्राह एनर्जीतर्फे सातत्याने प्रयत्न करण्यात येत आहेत, ही बाब उल्लेखनीय आहे आणि उज्ज्वल भविष्यकाळासाठी सुरू करण्यात आलेल्या या चळवळीत एक छोटीशी भूमिका निभावण्याची संधी मला मिळाल्याचा अत्यंत आनंद होत आहे.’ 

आर. सोमसुंदरम म्हणाले, ‘आपल्या रोजच्या कृतीमुळे पर्यावरणावर होणारा नकारात्मक परिणाम हवेचे प्रदूषण, भूजलपातळीमध्ये घट, प्लास्टिक कचऱ्याची निर्मिती इत्यादी स्वरुपात दिसू लागला आहे. यावर उपाययोजना करणे ही केवळ सरकार किंवा मोठ्या संस्थांचीच जबाबदारी नाही, तर सर्वांनीच त्यात खारीचा वाटा उचलला पाहिजे, ही जाणीव लोकांना झाली आहे.’ 

दिपेन पॉल म्हणाले, ‘मित्राह टॉक्स हा नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रात तरुणांचा विकास करण्यासाठी सुरू करण्यात आलेला उपक्रम आहे. आमच्या शिक्षकी पेशाच्या कारकीर्दीत विद्यार्थ्यांच्या मनात कौशल्याधारित अध्ययन आणि सामाजिक जबाबदारी बिंबविण्यासाठी अविरत प्रयत्न करत असतो आणि ‘मित्राहटॉक्स’ त्याचेच उदाहरण आहे. एसआयआयबीमध्ये मी असे अनेक विद्यार्थी पाहिले आहेत ज्यांना शिकून व्यावसायिक व्हायचे आहे आणि जगाला हाताळायचे आहे, दुसऱ्या बाजूला त्यांना सामाजिक जबाबादारीचीही जाणीव आहे. या संस्थेत मित्राह टॉक्सचे आयोजन आणि त्यात सोनम वांगचुक यांचा सहभाग असणे ही आमच्यासाठी बहुमानाची बाब आहे.’

या वेळी शाश्वत भविष्यकाळ घडविण्यासाठी उदयोन्मुख उद्योजकांच्या संकल्पनांची दखल घेण्यासाठी व्यासपीठ निर्माण करणे या उद्देशाने घेण्यात आलेल्या स्पर्धेत दोन विजेते घोषित करण्यात आले. पुण्यातील ऋषिक हिवाळे याची अंतिम फेरीसाठी स्पर्धक म्हणून निवड करण्यात आली असून, तो राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेत सहभागी होणार आहे. दिवील बजाज या स्पर्धेचा उपविजेता ठरला. 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search