Next
‘आयडिया’ची ग्राहकांसाठी ‘VoLTE’ सेवा
प्रेस रिलीज
Thursday, May 03, 2018 | 03:15 PM
15 0 0
Share this story

मुंबई : आयडिया सेल्युलर या देशातील एका प्रमुख टेलिकॉम कंपनीने महाराष्ट्र आणि गोवा, गुजरात, केरळ, तामिळनाडू, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड अशा सहा प्रमुख बाजारपेठांतील ग्राहकांसाठी ‘आयडियाVoLTE’ (व्हॉइस ओव्हर LTE) सेवा सुरू करण्याची घोषणा केली. या बाजारपेठांतील आयडिया ग्राहक दोन मेपासून क्रांतीकारी ‘VoLTE’ तंत्रज्ञानाचा लाभ घेऊ शकतील.

‘आयडिया VoLTE’ ही सेवा ‘फोर-जी LTE’ नेटवर्कवर अत्यंत उच्च दर्जाची स्पष्टता असलेली व्हॉइस सर्व्हिस देऊ करते. या तंत्रज्ञानाच्या वापरामुळे फोनवर बोलणार्‍यांचा आवाज सर्वसामान्य कॉल्समध्ये ऐकू येणार्‍या आवाजाच्या तुलनेत अधिक सुस्पष्टपणे ऐकायला येतो; तसेच बोलणार्‍या व्यक्तींच्या व्यतिरिक्तचे आजूबाजूचे आवाजही पुसले जात असल्याने आवाजाची स्पष्टता अधिकच वाढते. ही सेवा कमीत कमी वेळात कॉल जोडून देते आणि बॅटरीचा अधिक चांगला उपयोग करते.

‘आयडिया VoLTE’ या तंत्रज्ञानामुळे सबस्क्रायबर्सना व्हॉइस कॉल सुरू असतानाही फोर-जी इंटरनेट सेवा अबाधितपणे वापरता येते. याखेरीज यूजर्स फोर-जी नेटवर्कच्या क्षेत्रातून बाहेर गेल्यास ‘आयडिया VoLTE’ सेवेतील सिंगल रेडिओ व्हॉइस कॉल कन्टिन्यूईटी (एसआरव्हीसीसी) हे तंत्रज्ञान आपोआपच थ्री जी-टू जी नेटवर्कशी स्वत:ला जोडून घेते व कॉल कनेक्टिव्हिटी कायम राखते. ही सेवा वापरून ग्राहकांना सर्व मोबाइल आणि लॅंडलाइन नेटवर्क्सवर कॉल करता येईल.

या सेवेच्या व्यावसायिक शुभारंभाबद्दल बोलताना आयडिया सेल्युलरचे चीफ मार्केटिंग ऑफिसर शशी शंकर म्हणाले, ‘आयडिया VoLTE सेवेची सुरुवात म्हणजे डिजिटल माध्यमांनी जोडलेल्या ग्राहकांप्रती आम्ही जपलेल्या बांधिलकीचे मूर्त रूप आहे आणि मोबिलिटीच्या क्षेत्रातल्या आमच्या प्रवासातील एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे. या नव्या क्रांतीकारी तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आमच्या ग्राहकांना कॉल करण्याचा अधिक चांगल्या दर्जाचा आणि समृद्ध अनुभव देण्याचे आमचे लक्ष्य आहे. ‘आयडिया VoLTE’ तंत्रज्ञानसक्षम उपकरणांची विस्तृत श्रेणी बाजारात उपलब्ध असावी यासाठी आयडिया अनेक हॅंडसेट उत्पादक कंपन्यांशी हातमिळवणी करत आहे.’

आयडिया फोर-जी सीमद्वारे चालणार्‍या फोर-जी हॅंडसेट्समध्ये ‘आयडिया VoLTE’ तंत्रज्ञान उपलब्ध होईल. सध्या फोर-जी सुसंगत हॅंडसेट्स वापरणार्‍या आयडिया ग्राहकांचे फोन्स ‘आयडिया VoLTE’च्या सुधारित श्रेणीमध्ये अपग्रेड होतील. ऑनर ५सी, ऑनर ६एक्स, ऑनर ७एक्स, ऑनर व्ह्यू १०, ऑनर ९ लाइट आणि ऑनर ९आय या हॅंडसेट्समध्ये ‘आयडिया VoLTE’ सेवा उपलब्ध होईल. झिओमी रेडमी ४, सॅमसंग जे७ प्रो/ए५/ए७, वन प्लस ५/५टी आणि नोकिया ३/५, व्हिवो व्ही७प्लस हे सर्व उपकरण लवकरच ‘आयडिया VoLTE’साठी सक्षम होण्याकरिता ओव्हर द एअर (ओटीए) अपडेट पाठवणार आहे.

आयडिया ग्राहकांनी आपल्या फोनवरून केलेल्या पहिल्या ‘VoLTE’ कॉलनंतर ४८ तासांत त्यांना १०जीबी डेटाची भेट मिळणार आहे. ‘VoLTE’ वापरून केलेल्या कॉल्ससाठी ग्राहकांच्या चालू व्हॉइस टॅरीफनुसारच शुल्क आकारणी केली जाईल. ‘VoLTE’ सेवेचा अनुभव घेण्यासाठी ग्राहकांनी स्लॉट १मध्ये आयडिया फोर-जी सीम टाकून आपल्या अँड्रॉइड उपकरणामध्ये सेटिंग्ज-सिस्टिम अपडेट्स- डाउनलोड अ‍ॅंड इन्स्टॉल या मार्गाने जात हॅंण्डसेटचे सॉफ्टवेअर अपडेट करायचे आहे आणि ‘VoLTE’ बटन सुरू करून ‘VoLTE’ कॉल लावता येईल.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link