हिमायतनगर : शहरात आज (२२ ऑगस्ट २०१८) सकाळी मुस्लिम बांधवांनी ईदगाह मैदानावर जमून बकरी ईद हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला. या वेळी नगर पंचायतीचे नूतन नगराध्यक्ष कुणाल राठोड यांनी स्वतः तेथे उपस्थित राहून शहरातील सर्व मुस्लिम बांधवांना बकरी ईदच्या शुभेच्छा दिल्या. हिमायतनगर शहराची हिंदू-मुस्लिम एकतेची परंपरा कायम ठेवत हा सण साजरा केला जातो.
या वेळी उपनगराध्यक्ष जावीद भाई, नगरसेवक अन्वर खान पठाण, गजानन चायल, जुनेद भाई, शेख सालीम आणि इतर सर्व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
