Next
सेलभाईचा आयपीओसाठी अर्ज दाखल
प्रेस रिलीज
Tuesday, May 22 | 05:46 PM
15 0 0
Share this story

अहमदाबाद  : सेलभाई इंटरनेट लिमिटेड ही सेलभाई डॉट कॉमची मालक व ऑपरेटर कंपनी असून, मुंबई शेअर बाजार अर्थात बीएसईच्या एसएमई व्यासपिठावर तिने प्राथमिक समभाग विक्री म्हणजेच आयपीओसाठी  अर्ज दाखल केला आहे. ड्राफ्ट प्रॉस्पेक्टस अर्थात डीपी  पहिली ‘बी टू सी’ ई-कॉमर्स कंपनी ठरली आहे. 

आयपीओसाठी सेलभाईने २२ लाख ५९ हजार ६०० समभाग खुले केले असून, कंपनीच्या बाजारपेठेतील समभागांपैकी २६.५८ टक्के समभागांचा यात समावेश आहे. यातून २३.७३ कोटी रुपये उभारता येतील, अशी कंपनीला आशा आहे. आता बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या (बीएसई) एसएमई व्यासपिठावर तिची नोंदणी करण्यात येणार आहे. ग्राहकांच्या वाढत्या गरजांची पूर्तता करण्यासाठी, आयटी व्यासपिठाच्या सुधारणेसाठी, उत्पादन व सेलर्स कॅटेगरींमध्ये भर घालण्यासाठी या निधीचा वापर केला जाणार आहे. सेलभाई हा भारतातील स्थानिक वस्तूंची विक्री करणारा ई कॉमर्स मंच आहे.

आयपीओबद्दल बोलताना सेलभाईचे सहसंस्थापक विश्वविजय सिंग म्हणाले, ‘ग्राहकांच्या केवळ गरजाच नव्हे तर, त्यांचे या गोष्टींशी जोडलेले असण्यावर भर देण्यासाठी आम्ही ही कंपनी सुरू केली. आमचे अस्तित्व अधिक मोठे व मजबूत होण्यासाठी आम्ही कायम प्रयत्नशील राहत आहोत.’
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link