Next
गुजरात येथे ‘प्लास्ट इंडिया २०१८’ प्रदर्शन
प्रेस रिलीज
Saturday, December 09 | 04:15 PM
15 0 0
Share this story

पुणे : फेब्रुवारी २०१८मध्ये गांधीनगर (गुजरात) येथे ‘प्लास्ट इंडिया २०१८’ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. याविषयी स्थानिक उद्योजकांना माहिती देण्यासाठी येथील वेस्टीन हॉटेल येथे विशेष प्रसार मोहिमेचे आयोजन केले होते.

या प्रसंगी ‘प्लास्ट इंडिया’चे राष्ट्रीय कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष राजीव चितालिया, राष्ट्रीय प्रोत्साहन समितीचे (महाराष्ट्र आणि गोवा) अध्यक्ष चंद्रकांत तुराखिया, अजय देसाई, सत्यजित भोसले, डॉ. समीर जोशी, रवी जसनानी, अनिल नाईक, नितीन कोंडाळकर उपस्थित होते.

वाहन उद्योगासह शेतीच्या कामामध्ये प्लॅस्टिकचा वाढता वापर अर्थात प्लॅस्टिकल्चर हा पुण्याच्या प्लॅस्टिक उद्योगाचा कणा आहे. देशात शेतीसाठी प्लॅस्टिक्सचा सर्वोत्तम वापर करणार्‍या जिल्ह्यांमध्ये पुण्याचे वरचे स्थान आहे. येथे शेतकरी सिंचनाच्या आधुनिक पध्दती आणि अन्य प्लॅस्टिक्स अवजारांचा खुबीने वापर करीत असून, एकंदर प्लॅस्टिक्सच्या उपभोगाला हातभार लावत असल्याचे आढळले आहे.

शेतीव्यतिरिक्त पुण्याच्या प्लॅस्टिक उद्योगाला अनेक प्रकारच्या औद्योगिक आणि घरगुती वापरासाठी मागणी आहे. त्यामुळे प्लॅस्टिक उद्योगाला उत्पादनात अद्ययावत तंत्रज्ञानाच्या वापराची गरज भासत आहे. याचा प्रत्यय फेब्रुवारी २०१८मध्ये गांधीनगर येथे होत असलेल्या या आंतरराष्ट्रीय प्लॅस्टिक उद्योगाच्या प्रदर्शन, परिषद आणि व्यापार मेळाव्याच्या १०व्या पर्वात सहभागी होणार्‍या आणि भेट देऊ पाहणार्‍या पुणेस्थित व्यावसायिक उद्योजकांच्या मोठ्या गटाने दिला आहे.

याबद्दल चितालिया म्हणाले, ‘भारतातील हा एक सर्वांत मोठा प्लॅस्टिकविषयक व्यापार-मेळा असेल. एक्सॉन मोबिल, रिफेनहाउजर जीएमबीएच यासारख्या जागतिक अग्रणी समुहांसह एकंदर ४० देशांमधील दोन हजारांहून अधिक प्रदर्शकांचा सहभाग आणि तब्बल दोन लाखांहून अधिक व्यापार प्रतिनिधींनी त्याला भेट देणे अपेक्षित आहे. नवीन तंत्रज्ञानात्मक प्रवाह जाणून घेण्याची आणि नविनतम बाजारपेठ संधींना पारखण्याची ही एक सर्वोत्तम संधी असेल.’

चितालिया पुढे म्हणाले, ‘विविध परिषदा, चर्चासत्रे आणि संवाद व्यासपीठे आणि खरेदीदार-विक्रेते भेटीगाठीतून ज्ञान आणि माहितीचे आदानप्रदान होईल. एचडीएफसी बँकेद्वारे पूर्वमंजूर वित्तपुरवठ्याच्या सोयीलाही ध्यानात घेतले गेले आहे. हा उपक्रम म्हणजे भारताच्या प्लॅस्टिक उद्योगाला जागतिक स्तरावर विकासासाठी सक्षमता प्रदान करणाराच असेल.’

‘२०२०पर्यंत केवळ शेती क्षेत्रात वार्षिक २० लाख टन प्लॅस्टिकचा वापर असलेला भारत हा जगातील तिसरा मोठा प्लॅस्टिक उपभोगकर्ता देश असेल,’ असे नमूद करीत ‘आगामी पाच वर्षांत आपल्या उद्योगात पुढे काय, असे कोणीही विचारणारा नसेल, तर आपल्या उद्योगाची भरारीच आगामी भविष्याचा उज्वल पथ दाखविणारी असेल,’ असे त्यांनी सांगितले.

‘प्लास्ट इंडिया २०१८’ हा त्रैवार्षिक उपक्रम असून, जगातील हे दुसरे मोठे तर दक्षिण आशियातील सर्वात मोठे प्रदर्शन आहे. या उपक्रमाला भारत सरकार, गुजरात राज्य आणि इंडेक्सटीबी यांचे पाठबळ लाभले आहे.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link