Next
ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत 'संध्या कट्टा'
प्रेस रिलीज
Friday, March 09, 2018 | 06:28 PM
15 0 0
Share this story

'संध्या कट्ट्या'बाबत माहिती देताना वंचित विकास संस्थेचे अध्यक्ष विजयकुमार मर्लेचा, संचालिका मीनाताई कुर्लेकर, देवयानी गोंगले व मीनाक्षी नवले.
पुणे : ‘उतारवयात हरवलेले आनंदाचे क्षण ज्येष्ठ नागरिकांना परत मिळावेत, एकाकीपण दूर होऊन त्यांना हलकेफुलके आयुष्य जगता यावे, यासाठी पुण्यातील जाणीव व वंचित विकास संस्थेतर्फे रोज सायंकाळी मोफत ‘संध्या कट्टा’ भरविला जाणार आहे. ग्रामीण भागातून शिक्षणासाठी पुण्यात आलेल्या गरजू विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिकेचीही सोय करण्यात येणार आहे’, अशी माहिती वंचित विकास संस्थेचे अध्यक्ष विजयकुमार मर्लेचा व संचालिका मीनाताई कुर्लेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. या वेळी  वंचित विकासच्या देवयानी गोंगले व मीनाक्षी नवले यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.

मीनाताई कुर्लेकर म्हणाल्या, ‘नारायण पेठेतील संस्थेच्या कार्यालयातील जागेत रोज संध्याकाळी भरणाऱ्या या कट्ट्यांमध्ये मनमोकळ्या गप्पा, सल्ला व मार्गदर्शन, सुख दुःखाची देवाण घेवाण, मार्गदर्शनपर सत्रे, कलांचे रसग्रहण, समुपदेशन, कायदेशीर सल्ला, सहलीचा आनंद, वेगवेगळी शिबिरे, विविध विषयांवरील वैज्ञानिक चर्चा यासारख्या विषयांवर भर दिला जाणार आहे. यात प्रामुख्याने एकमेकांशी मनमोकळेपणाने संवांद, एकमेकांची सुखदुःखे, धावपळीच्या आयुष्यात मागे गेलेल्या क्षणांना पुन्हा उजाळा देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. शरीराला वृद्धत्व आले तरी, मनाने सतत चिरतरुण राहणे आवश्यक आहे. या संध्या कट्ट्यामध्ये सर्व ज्येष्ठ नागरिकांना सहभागी होता येणार आहे.’

 ‘घरामध्ये मुलांना पुरेसा वेळ व पोषक वातावरण मिळत नाही म्हणूनच ग्रामीण भागातून पुण्यात शिक्षणासाठी आलेल्या मुलांना अभ्यास करण्यासाठी अभ्यासिकेची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. एमपीएससी, यूपीएससीसाठी आवश्यक पुस्तके, अन्य उपयुक्त पुस्तकांचा समावेश या अभ्यासिकेमध्ये करण्यात आला आहे. सकाळी ७.३० ते ११ आणि सायंकाळी ५ ते १० या कालावधीमध्ये विद्यार्थ्यांना येथे अभ्यास करता येईल. त्याशिवाय, अवांतर वाचनासाठी वाचनालयाची सुविधा उपलब्ध असणार आहे.’ असेही त्यांनी नमूद केले. 

‘मानसिक ताणतणावातून मुक्त करून आनंदी जीवन जगण्याचा दृष्टिकोन देण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. कोणत्याही वयोगटाच्या व्यक्तीला सल्ला, मार्गदर्शन करण्याचे काम देखील संस्थेमार्फत केले जाणार असल्याचे’,  मीनाक्षी नवले यांनी सांगितले. 

अधिक माहितीसाठी 
कार्यालय : वंचित विकास, ४०५/९, नारायण पेठ, मोदी गणपतीमागे, पुणे-३० 
दूरध्वनी क्रमांक : (०२०) २४४५४६५८, २४४८३०५० 
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Balkrishna gramopadhye About 19 Days ago
There is a need for such service. Best wishes.
0
0

Select Language
Share Link