Next
देवेंद्र फडणवीस यांची एक ऑगस्टपासून महाजनादेश यात्रा
BOI
Thursday, July 25, 2019 | 05:55 PM
15 0 0
Share this article:

मुंबई : राज्य सरकारच्या पाच वर्षांतील कामांचा हिशोब जनतेपुढे ठेवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेला राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे कर्मस्थान असलेल्या अमरावती जिल्ह्यातील मोझरी येथून एक ऑगस्टपासून प्रारंभ होणार आहे. लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीचे आणि लोकमान्य टिळक पुण्यतिथीचे औचित्य साधून सुरू होणाऱ्या या यात्रेचा समारोप ३१ ऑगस्टला नाशिक येथे होणार आहे.

विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्र येथून एक ते नऊ ऑगस्ट दरम्यान पहिला टप्पा होणार असून, या भागातील एकूण १४ जिल्ह्यांत ही यात्रा जाणार आहे. या दरम्यान ५७ विधानसभा मतदारसंघातून एक हजार ६३९ किलोमीटरचा प्रवास करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्याचा समारोप नंदुरबार येथे होणार आहे. यात्रेचा दुसरा टप्पा १७ ऑगस्टला  सुरू होईल. दुसऱ्या टप्प्यांत ही यात्रा १८ जिल्ह्यांतल्या ९३ विधानसभा मतदारसंघात दोन हजार ७४५ किलोमीटर एवढा प्रवास करणार आहे. यात्रेचा एकूण प्रवास ३२ जिल्ह्यांतून चार हजार ३८४ किलोमीटर एवढ्या अंतराचा असणार आहे. दोन्ही टप्पे मिळून १५० विधानसभा मतदारसंघांमधून ही यात्रा जाणार आहे. या दरम्यान ८७ मोठ्या सभा, ५७ स्वागत सभा होणार आहेत. याशिवाय एकूण २३८ पेक्षा अधिक गावांमध्ये स्वागत स्वीकारून यात्रा नाशिक येथे पोहोचेल. या यात्रेचे प्रमुख प्रदेश सरचिटणीस आमदार सुजितसिंह ठाकूर हे आहेत.

यात्रेच्या उद्घाटनप्रसंगी आणि समारोपप्रसंगी भारतीय जनता पक्षाचे सर्व मंत्री उपस्थित राहणार आहेत. फडणवीस सरकारच्या गेल्या पाच वर्षांतील कामगिरीचे दर्शन घडविणारा एलईडी रथ यात्रेबरोबर असणार आहे; तसेच यात्रेदरम्यान होणाऱ्या कार्यक्रमांचे थेट प्रक्षेपण केले जाणार आहे. यात्रा ज्या-ज्या जिल्ह्यांतून प्रवास करेल तेथे त्या-त्या जिल्ह्यांतील मंत्री, लोकप्रतिनिधी आणि पक्षाचे सर्व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.      
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search