Next
‘जबरिया जोडी’ चित्रपटाचे डी. वाय. पाटील विद्यापीठात प्रमोशन
BOI
Thursday, August 01, 2019 | 06:32 PM
15 0 0
Share this article:


पिंपरी-चिंचवड : ‘जबरिया जोडी’ या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी अभिनेत्री परिणिती चोप्रा व अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा ही जोडी पिंपरी-चिंचवडमधील डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठात आली होती. ही जबरिया जोडी दंत महाविद्यालयात येताच सर्वांनी एकच जल्लोष केला व उत्साहात या जोडीचे स्वागत केले... 

परिणिती व सिद्धार्थ दंत महाविद्यालयात येताच टाळया व शिट्ट्यांचा मोठा आवाज झाला. मोठ्या जल्लोषात तरुणाईने त्यांचे स्वागत केले. या प्रमोशनदरम्यान सिद्धार्थने चित्रपटाविषयी थोडक्यात सांगितले. बिहारमध्ये प्रचलित असलेल्या वरांचे (पाकडवा विवाह) अपहरण करण्याच्या प्रथेवर हा चित्रपट आधारित असल्याचे त्याने सांगितले.

या वेळी या जबरिया जोडीने चित्रपटाच्या गाण्यांवर फेर धरला. मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांनीही त्यांच्यासोबत यात भाग घेतला. येत्या ९ ऑगस्टला हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होत आहे. सर्वांनी तो पाहावा यासाठी परिणिती व सिद्धार्थ यांनी सर्वांना आवाहन केले.   

डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे विश्वस्त व कोषाध्यक्ष डॉ. यशराज पाटील व त्यांच्या पत्नी यशश्री पाटील यांनी परिणिती  चोप्रा व सिद्धार्थ मल्होत्रा यांचे स्वागत केले. या चित्रपटाच्या यशासाठी त्यांनी या जोडीला शुभेच्छा दिल्या.

(To read this news in English, please click here.)

(सोबत व्हिडिओ देत आहोत.)

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search