Next
हिमायतनगरमध्ये प्रधानमंत्री आवास योजनेच्या धनादेशांचे वाटप
नगरपंचायत कार्यालयात विविध योजनांचे लोकार्पण
नागेश शिंदे
Tuesday, July 09, 2019 | 05:38 PM
15 0 0
Share this article:


हिमायतनगर : शहरातील नगरपंचायत कार्यालयातर्फे शहरातील विविध विकासकामांचा लोकार्पण सोहळा, तसेच अग्निशमन वाहनांचे व स्वछताविषयक साहित्याचे उद्घाटन हदगाव-हिमायतनगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार नागेश पाटील-आष्टीकर यांच्या हस्ते झाले. हा कार्यक्रम नगराध्यक्ष कुणाल राठोड यांच्या अध्यक्षतेखाली आठ जुलै २०१९ रोजी झाला.

हिमायतनगर शहरात एखाद्या क्षणी आग लागल्याची घटना घडल्यास ती विझवण्यासाठी अपुरी यंत्रणा होती. त्यासाठी नगरपंचायत कार्यालयामार्फत गेल्या महिन्यांपासून पाठपुरावा सुरू होता. आमदार नागेश पाटील यांच्या प्रयत्नाने अग्निशमन वाहन आणि त्या सोबतच शहरातील प्रत्येक प्रभागात ओला व सुका कचरा वेगवेगळा गोळा करण्यासाठी वेगवेगळ्या कचराकुंड्या देण्यात येणार आहेत. हा कचरा उचलण्याचे काम नगरपंचायतीमार्फत केले जाणार आहे. त्याचबरोबर तीन महिन्यांपूर्वी हिमायतनगर नगरपंचायतीने मंजूर करून आणलेल्या प्रधानमंत्री आवास योजनेतील एक हजार २१५ घरकुलांच्या पहिल्या टप्प्यातील लाभार्थींना धनादेशाचे वाटप करण्यात आले.


या वेळी उपनगराध्यक्ष मो.जावेद भाई, मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे, नगरसेवक रामभाऊ ठाकरे, अन्वर खान पठाण, प्रभाकर अण्णा, सदाशिव सातव, सरदार खान पठाण, सावन डाके, गुफ्रान भाई, विनायक मेंडके, शिंदे, फेरोज खान पठाण, भोरे बाई, आहद भाई, गावातील कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गजानन तुप्तेवार, हदगाव येथील माजी नगराध्यक्ष प्रभाकरराव देशमुख, शिवसेना तालुकाप्रमुख रामभाऊ ठाकरे, उपतालुका प्रमुख विलास वानखेडे, तालुका संघटक संजय काईतवाड, युवासेना तालुकाप्रमुख विशाल राठोड, शहरप्रमुख प्रकाश रामदीनवार, जेष्ठ शिवसैनिक विठ्ठल ठाकरे, रामू नरवाडे, डॉ. प्रसाद डोंगरगावकर, अरविंद पाटील सिरपल्लिकर, शंकर पाटील, बाळुअण्णा चवरे, राजेश जाधव, योगेश चिल्कावार, अमोल धुमाळे, गजानन हरडपकर, बंडू अनगुलवार, इद्रीस शेवाळकर, नितीन मुधोळकर, विठ्ठल पार्डिकर, सुनील चव्हाण, मंगेश धुमाळे, दुर्गेश मंडोजवार, निक्कू ठाकूर, शेख खुदुस शेवाळकर, नगरपंचायतीचे कार्यालय अधीक्षक मुक्ता कांदे, लेखापाल बालाजी माळचापुरे, अभियंता रमाकांत बाच्छे, रफिक अहेमद, रत्नाकर डावरे, लिपिक शेख महेबूब, मारोतराव हेंद्रे, बाळू हरडपकर, विठ्ठल शिंदे, श्याम पाटील, शेख मोजमिल, मुकादम विठ्ठल बनसोडे, शेख रबानी यांच्यासह सर्व नगरसेवक व नगरसेविकांची उपस्थिती होती.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे यांनी केले. सूत्रसंचालन विठ्ठल शिंदे यांनी केले.


 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search