Next
‘अक्षरा’ प्रदर्शन : हस्तकला आणि अक्षरांचा अनोखा संगम
BOI
Friday, September 28 | 05:30 PM
15 0 0
Share this story

पुणे : वेगवेगळ्या भाषांमधील अक्षरे आणि पारंपरिक हस्तकलेचे विविध प्रकार यांचा अनोखा मिलाफ ‘अक्षरा’ या प्रदर्शनातून रसिकांना अनुभवायला मिळत आहे. ८४व्या ‘पेन इंटरनॅशनल काँग्रेस’च्या निमित्ताने ‘दस्तकारी हाट समिती’च्या वतीने पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर कलादालनात हे अनोखे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. २९ सप्टेंबर २०१८पर्यंत ते रसिकांना पाहण्यासाठी खुले आहे.

१४ भाषा आणि २१ हस्तकला शैली यांच्या मिलाफातून साकारण्यात आलेल्या अत्यंत आकर्षक, वैविध्यपूर्ण वस्तू येथे पाहायला मिळत आहेत. १६ राज्यांमधील ७० कारागिरांनी हे कलाकुसरीचे उत्कृष्ट नमुने साकारले आहेत. भाषेचा उगम, अक्षरे, लिपी यांचा प्रवास याद्वारे उलगडण्यात आला आहे. 

कागद, कापड, लाकूड अशा माध्यमांचा वापर करून, वेगवेगळ्या भाषांमधील अक्षरांच्या साह्याने कलाकुसर केलेल्या साड्या, आकाशकंदील, कपाटे, दिवे, वॉल हँगिंग अशा अनेकविध वस्तूंचा यात समावेश आहे. जया जेटली यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले असून, अक्षरे आणि पारंपरिक हस्तकला यांची अप्रतिम सांगड या कलाकुसरीतून दिसून येते. विविध भाषांमधील लिपी, अक्षरे लोकांपर्यंत पोहोचवण्याचा हा अभिजात मार्ग असून, त्याला रसिकांची उत्तम दाद मिळत आहे. 

‘दस्तकारी हाट समिती’ गेली २६ वर्षे हस्तकला कारागिरांच्या प्रगतीसाठी कार्यरत असून, अनेक दुर्मीळ पारंपरिक हस्तकला जतन करण्यासाठी प्रयत्नशील आहे. सध्या १५००पेक्षा अधिक कारागीर या समितीशी जोडले गेले असून, प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या ३० हजार लोकांना त्याचा लाभ होत आहे’, अशी माहिती चारू वर्मा यांनी दिली.  

(या प्रदर्शनाची झलक पाहा सोबतच्या व्हिडिओत.)

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link