Next
येस फाउंडेशनतर्फे ‘मीडिया फॉर सोशल चेंज फेलोशिप’
प्रेस रिलीज
Tuesday, July 24, 2018 | 03:31 PM
15 0 0
Share this article:

दिल्ली : येस बँकेच्या येस फाउंडेशनतर्फे उच्च क्षमता असलेल्या सुमारे ५५० तरुणांना मीडिया फॉर सोशल चेंज फेलोशिप २०१८ या आपल्या मुख्य कार्यक्रमाद्वारे भारतभर परिवर्तक ठरण्याची संधी उपलब्ध केली आहे. येस बँकेचे पाठबळ असलेली व आयएसडीआय– डब्लूपीपी स्कूल ऑफ कम्युनिकेशन यांचा सहयोग असलेली ही फेलोशिप तरुणांमध्ये सामाजिक जागरुकता असलेले नेतृत्व विकसित करण्याचा प्रयत्न करते.  

या वर्षी, या कार्यक्रमामध्ये बहुस्तरीय कठोर निवड प्रक्रियेद्वारे भारतातील ५३५ ठिकाणच्या सात हजार ७०० अर्जांमधून निवडलेल्या अंदाजे ५५ फेलोंसाठी संधी उपलब्ध केली आहे. उच्च क्षमता असलेल्या फेलोंना मुंबई, दिल्ली, बेंगळुरू, अहमदाबाद व पुणे येथील १०१ विश्वासार्ह एनजीओंमध्ये काम देण्यात आले असून, तेथे ते सात आठवड्यांच्या एनजीओ प्लेसमेंटमध्ये उत्तम प्रकारच्या कम्युनिकेशन प्रोजेक्टवर काम करणार आहेत. दिल्लीतील अंतिम गटामध्ये उच्च क्षमता असलेल्या ३०० फेलोंचा समावेश होता.

येस फाउंडेशनने २०१६मध्ये फेलोशिप सुरू केली. या आवृत्तीमध्ये अन्य प्रोफेशनल कोर्सेसबरोबरच इंजिनीअरिंग, आर्ट्स, आर्किटेक्चर, वित्त, मेडिसिन अशा क्षेत्रांतील विद्यार्थ्यांचाही सहभाग होता. या कार्यक्रमामुळे भविष्यातील नेत्यांमध्ये संवेदनशीलता रुजवली जाईल, शिवाय विकास क्षेत्रासाठी संसाधने निर्माण केली जातील. इंडक्शनदरम्यान ग्रॅज्युएटना नेतृत्व, कम्युनिकेशन, सोशल मीडिया व विकास क्षेत्राशी ओळख या क्षेत्रांतील तज्ज्ञ प्रशिक्षण व मार्गदर्शन दिले जाईल. यामुळे एनजीओ व सामाजिक समस्यांशी ओळख होऊन त्यांचा वैयक्तिक विकास साधला जाईल. प्लेसमेंटदरम्यान फेलोंना टाटा ट्रस्ट, हेल्पएज इंडिया, सेव्ह द चिल्ड्रन, मॅजिक बस अशा एनजीओ पार्टनरनी सामावून घेतले.


फेलोशिप कार्यक्रमाबद्दल बोलताना येस फाउंडेशनचे चीफ मेंटॉर व सह-अध्यक्ष राणा कपूर म्हणाले, ‘भारतातील समावेशक विकासासाठी देशातील तरुणांच्या सकारात्मक उर्जेला चालना देणे गरजेचे झाले आहे. देशासमोर विकासविषयक मोठी आव्हाने आहेत, पण या आव्हानांमध्येही भारतीय तरुणांसाठी संधी दडलेली आहे. त्यांना सर्जनशीलता दाखवण्यासाठी, उपाय शोधण्यासाठी व चांगला परिणाम करण्यासाठी अनेक संधी उपलब्ध आहेत.’

येस फाउंडेशनच्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रेरणा लांगा म्हणाले, ‘व्यवस्थेतील तफावत भरून काढणे गरजेचे आहे, असे आम्हाला वाटते. या दिशेने, विकास क्षेत्र अधिक सक्षम करण्यासाठी कम्युनिकेशन व संसाधने देण्याबरोबरच, येस फाउंडेशन मीडिया फॉर सोशल चेंज फेलोशिपमुळे तरुणांना उत्तम सामाजिक नेते होण्यासाठी सबल केले जाणार आहे. तरुणांतील उत्साह व बांधिलकी पाहून आनंद वाटतो. एनजीओंचा सामाजिक परिणाम वाढवण्यासाठी एनजीओंचे मूल्य वाढेल, याची खात्री आहे.’
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search