Next
‘सहकार क्षेत्रात महिला, तरुणांना प्रोत्साहन देण्याची आवश्यकता’
प्रेस रिलीज
Friday, November 16, 2018 | 03:02 PM
15 0 0
Share this story

मुंबई : ‘जागतिक पातळीवर जपान, जर्मनी, फ्रान्स, नेदरलँड आणि अमेरिका, बांगलादेश यांच्या सहकार क्षेत्रातील विकासाच्या तुलनेत भारतीय सहकार उद्योगांना बरीच प्रगती करायची आहे. महिला आणि तरुण यांचा या क्षेत्रातील सहभाग निम्न असून, त्यांना प्रोत्साहन देण्याची आवश्यकता आहे,’ असे प्रतिपादन उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी केले.

लक्ष्मणराव इनामदार यांच्या जन्मशताब्दीनिमित्त मुंबई विद्यापीठात सहकार भारतीद्वारा ‘सहकार’ या विषयावर व्याख्यान आयोजित केले होते. त्यावेळी ते बोलत होते. ‘महाराष्ट्राच्या सातारा जिल्ह्यात ऋषीपंचमीला जन्मलेल्या लक्ष्मणराव इनामदार यांनी खऱ्या अर्थाने ऋषी म्हणून आपले सर्व जीवन समाजसेवेत अर्पण केले. सहकार्याची कल्पना इनामदार यांनी सर्वप्रथम रुजवली आणि सहकार भारतीद्वारे रचनात्मक सहकार आंदोलन घडवून देशभरात जवळपास ४५० जिल्ह्यांमध्ये तसेच विभिन्न क्षेत्रात २० हजार सहकारी समित्यांची त्यांनी स्थापना केली,’ असे नायडू यांनी सांगितले.

नायडू म्हणाले, ‘जागतिक पातळीवर जपान, जर्मनी, फ्रान्स, नेदरलँड आणि अमेरिका, बांगलादेश यांच्या सहकार क्षेत्रातील विकासाच्या तुलनेत भारतीय सहकार उद्योगांना बरीच प्रगती करायची आहे. महिला आणि तरुण यांचा या क्षेत्रातील सहभाग निम्न असून, त्यांना प्रोत्साहन देण्याची आवश्यकता आहे. सहकारी पतसंस्थांची कार्यपद्धती, अपुरे स्रोत, सरकारवरील अवलंबितेत वाढ या बाबींमुळे सहकार क्षेत्राची वाढ खुंटली आहे. अर्थव्यवस्था म्हटले, की स्पर्धा आलीच आणि अति स्पर्धेच्या वातावरणात अर्थव्यवस्थेला हानी होण्याची शक्यता असते. त्यामुळे स्पर्धेला मर्यादा आहे; परंतु सहकारी क्षेत्रात स्पर्धा अमर्यादित आहेत.

सहकार क्षेत्रातील व्यवस्थापन, सदस्यांच्या सहभागाची उणीव, संस्थांमधील राजकारण, नोकरशाहांचे नियंत्रण या आव्हानांवर प्रकाशझोत टाकत आधुनिक तंत्रज्ञानात्मक अर्थव्यवस्था आणि व्यावसायिक वातावरण सकस असण्यावर नायडू यांनी जोर दिला.

भारतातील कृषी क्षेत्रासाठी केलेल्या विकासकामांच्या घडामोडींचा आढावा घेताना ते म्हणाले, ‘भारतीय कृषी क्षेत्राला चौकटात्मक बंधांचा अंकुश आहे. सध्या केवळ ५.२ टक्के कृषी कुटुंबांकडे स्वत:चे ट्रॅक्टर असून ८५ टक्के कृषी जमीन ही लघु आणि दोन हेक्टरपेक्षा कमी मोजमापाची आहे. ठिबक सिंचन योजना ही केवळ १.६ टक्के कृषी कुटुंबांकडे ही सुविधा उपलब्ध आहे. २०२० पर्यंत सरकार शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट वाढवण्यावर जोर देत आहे. यासाठी सरकारने प्रधानमंत्री फसल बीमा योजना, कृषी सिंचन योजना, जनधन योजना आणि मुद्रा अशा योजनांची अंमलबजावणी केली आहे. तसेच सरकारने ६३ हजारपेक्षा जास्त प्राथमिक कृषी सहकारी संस्थांना संगणकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी अंदाजपत्रकीय पाठिंबा दिला आहे. या सर्व योजनांचा लाभ शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे अन्यथा विकासाला खीळ बसण्याची शक्यता बसेल.’

भारतीय सहकार चळवळ ही मोठ्या प्रमाणावर कार्यरत असून, ज्यामध्ये ७५ टक्के ग्रामीण कुटुंब आणि २५ कोटी सदस्य असलेल्या ८.५० लाख सहकारी संस्था अस्तित्वात आहेत. ‘अमूल’ हे सहकारी क्षेत्रातील भारतातील एक यशस्वी उदाहरण असून, ज्याद्वारे भारतात श्वेतक्रांती घडवली गेली. मागील काही वर्षांमध्ये खते, साखर आणि कपास या क्षेत्रात सहकारीता तत्व अवलंबण्यात येत असल्याचे नायडू यांनी सांगितले.

‘लक्ष्मणराव इनामदारांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे गुजरातचे संघ प्रचारक म्हणून काम करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राजनैतिक आणि सामाजिक मार्गदर्शन करून शैक्षणिक क्षेत्रासाठी प्रोत्साहन दिल्याचे त्यांनी नमूद केले.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link