Next
‘कॅनरा एचएसबीसी’ची उत्कृष्ट कामगिरी
प्रेस रिलीज
Thursday, May 31, 2018 | 01:00 PM
15 0 0
Share this story

मुंबई : कॅनरा एचएसबीसी ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स लाइफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेडने २०१७-१८ या आर्थिक वर्षातील निकाल जाहीर केले असून, अगोदरच्या वर्षीच्या तुलनेत ५१ टक्के अधिक म्हणजे १६८ कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे.  

२०१७-१८ या आर्थिक वर्षातील कंपनीच्या कामगिरीची ठळक वैशिष्ट्ये अशी : कंपनीच्या वैयक्तिक नव्या बिझनेस प्रीमिअममध्ये (वेटेड प्रीमिअम इन्कम) ३४ टक्के म्हणजे ६१३ कोटी रुपयांवरून २०१७-१८ या आर्थिक वर्षात ८१८ कोटी रुपयांपर्यंत वाढ झाली. या क्षेत्राने याच कालावधीत १९ टक्के वाढ साध्य केली आहे. गेल्या तीन वर्षांत (२०१४-१५ ते २०१७-१८), कंपनीच्या वैयक्तिक नव्या बिझनेस प्रीमिअममध्ये (वेटेड प्रीमिअम इन्कम) ३६ टक्के इतक्या एकत्रित वार्षिक दराने वाढ झाली, तर एकंदर हे क्षेत्र १६ टक्के वाढले. कंपनीच्या ग्रॉस रिटन प्रीमिअममध्ये २१ टक्के म्हणजे, दोन हजार २९५ कोटी रुपयांवरून दोन हजार ७८१ कोटी रुपयांपर्यंत वाढ झाली.

कंपनीचे तेराव्या महिन्यातील सातत्य ७७.९ टक्के आहे. कंपनीचे दावे पूर्ण करण्याचे एकंदर गुणोत्तर ९७.१८ टक्के आहे. ऑपरेटिंग एक्स्पेन्स रेश्यो अगोदरच्या वर्षातील १४ टक्क्यांवरून १३ टक्क्यांपर्यंत कमी झाला. ३१ मार्च २०१८ पर्यंत अॅसेट्स अंडर मॅनेजमेंट (एयूएम) १२ हजार ६९० कोटी रुपये आहे. फंडांनी दीर्घकाळामध्ये बेंचमार्कच्या तुलनेत अधिक परतावा दिला आहे.   

कंपनीची वैविध्यपूर्ण उत्पादने सर्व श्रेणींतील ग्राहकांच्या निरनिराळ्या गरजा पूर्ण करत असून, ग्राहकांच्या आगामी गरजा पूर्ण करण्याच्या हेतूने कंपनीने २०१७-१८ या आर्थिक वर्षात पाच योजना दाखल केल्या. त्यामध्ये, मास-मार्केट सेग्मेंटला किफायतशीर व स्पर्धात्मक प्रीमियम भरून आर्थिक सुरक्षितता देणाऱ्या पहिल्या पीओएस उत्पादनाचा समावेश आहे. ‘पीओएस (पॉइंट ऑफ सेल) ईझी बिमा प्लान हा पूर्णतः टर्म इन्शुरन्स प्लान असून, तो लाइफ कव्हर देतोच, शिवाय मुदतपूर्तीपर्यंत हयात असल्यास पेमेंट टर्मदरम्यान भरलेले सर्व प्रीमिअम परत करतो.

वर्षभरामध्ये कंपनीने ग्राहकांना सुरळीत सेवा देण्यासाठी व योजनेच्या कालावधीतील प्रत्येक टप्प्यामध्ये जास्तीत जास्त कार्यक्षमता साधण्यास मदत करण्यासाठी अनेक डिजिटली एनेबल्ड सेवा सुरू केल्या आहेत. ग्राहकांना सर्वोच्च दर्जाची सेवा देण्यासाठी कंपनीने मयत योजनाधारकांच्या कुटुंबाला सहकार्य करण्यासाठी ग्रिफ सपोर्ट प्रोग्रॅम सुरू केला आहे.

कंपनीच्या आर्थिक निकालांविषयी बोलताना कॅनरा एचएसबीसी ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स लाइफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनुज माथुर यांनी सांगितले, ‘२०१७-१८ हे आर्थिक वर्ष आमच्यासाठी अतिशय चांगले होते. आम्ही टिअर टू व टिअर थ्री शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावर भर दिल्याने या वर्षी प्रामुख्याने बिगर-मेट्रो शहरांमध्ये अधिक वाढ साधता आली. या यशामुळे, शहरी व ग्रामीण भागातील ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी बँकाश्युरन्स मॉडेलमध्ये असलेली क्षमता दिसून येते. आम्ही कंपनी एकत्रितरित्या ब्रेक-इव्हनपर्यंत आणण्याच्या दिशेने स्थिरपणे वाटचाल करत आहोत आणि आर्थिक वर्ष २०१९ मध्ये नफात्मक वाढ साध्य करण्याच्या हेतूने नियोजन करत आहोत.’

आगामी वाटचालीविषयी :
प्रगतीशील डिजिटल तंत्रज्ञान आणि चॅटबोट व आर्टिफिशिअल इंटलिजन्स यांचा वापर करून उत्कृष्ट सेवा याद्वारे ग्राहकांना सर्वोत्तम अनुभव देणे. कस्टमर प्रॉस्पेक्टिंग, ऑन-बोर्डिंग, अंडररायटिंग, सर्व्हिसिंग व दाव्यांची पूर्तता ऑटोमेट करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर. विमा व्यवसायासाठी ब्लॉक चेन तंत्रज्ञानाचा वापर करण्याच्या हेतूने तयार केलेल्या उद्योगांच्या समूहामध्ये कंपनीचा समावेश. विम्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढवणे आणि टिअर टू व टिअर थ्री शहरांतील ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी डिजिटल व फिजिकल चॅनल सक्षम करणे.

‘कॅनरा एचएसबीसी लाइफ इन्शुरन्स’विषयी :
कॅनरा एचएसबीसी ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स लाइफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेडची स्थापना जून २००८मध्ये झाली आणि ही भारतातील दोन सर्वात मोठ्या सरकारी कंपन्यांची संयुक्त मालकीची कंपनी आहे. कॅनरा बँक (हिस्सा ५१ टक्के) व ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स (२३ टक्के) आणि एचएसबीसी इन्शुरन्स (एशिया पॅसिफिक) होल्डिंग्स लिमिटेड (२६ टक्के), एचएसबीसी या जगातील सर्वात मोठ्या बँकिंग व वित्तीय सेवा समूहाची आशियातील विमा कंपनी.

कंपनीसाठी कॅनरा बँक, एचएसबीसी व ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स व भागीदार यांचे देशभरातील दहा हजारांहून अधिक शाखांचे जाळे उपलब्ध आहे. बँकेच्या शाखांद्वारे व सुरळीत एकात्मिकरण करून कॅनरा एचएसबीसी ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स लाइफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेडने कमी शुल्कामार्फत ग्राहकांना बचतीचा लाभ देण्याचे व यामुळे कंपनीची उत्पादने सर्वात स्पर्धात्मक व सुलभ उपलब्ध करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link